Budh Transit 2025 : ज्योतिषशास्त्रात बुध हा एक अतिशय महत्त्वाचा ग्रह मानला जातो. जर तो कुंडलीत बलवान किंवा शुभ स्थानावर असेल तर, ती व्यक्ती आपल्या बोलण्याने इतरांवर प्रभाव पाडते. ती व्यक्ती बुद्धिमान, तार्किक, तर्कशुद्ध आणि व्यवसाय करण्यात पारंगत असते. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार 7 मे 2025 रोजी मेष राशीत बुधाचे संक्रमण होणार आहे, जे चांगले मानले जात नाही, कारण मेष राशी मंगळाची असल्याने मंगळ हा बुधाचा शत्रू मानला जातो. ज्यांचा संयोग अशुभ असण्याचे संकेत आहेत. या संदर्भात डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. जाणून घ्या..

Continues below advertisement


बुधाच्या संक्रमणाचा विविध राशी, देश, जगावर होणार परिणाम?


ज्योतिषशास्त्रानुसार, 7 मे 2025 रोजी दुपारी 3:36 वाजता बुध ग्रह मंगळाच्या मेष राशीत संक्रमण करणार आहे. मेष राशीत बुध ग्रह अजिबात आरामदायक मानला नाही, म्हणून मेष राशीत बुधाचे संक्रमण राशींवर आणि देश आणि जगावर खूप नकारात्मक असे परिणाम करेल. बुध हा तार्किक तर मंगळ हा आक्रमक गणला जातो. मिथुन आणि कन्या राशींचा स्वामी बुध आहे आणि कन्या ही बुध राशीची उच्च रास देखील आहे. मीन राशीत बुध ग्रह नीच होतो आणि 15 अंशांवर तो सर्वात बलवान मानला जातो. 


कोणत्या राशींना हे बुधाचे संक्रमण त्रासदायक ठरू शकते?


बुध ग्रहाचे गोचर मंगळच्या मेष राशीत होणे हे विशिष्ट राशींकरिता थोडं त्रासदायक ठरू शकतं, कारण बुध हा बुद्धी, संवाद, व्यापार आणि विचारशक्तीचा कारक आहे, तर मंगळ हा उर्जा, क्रोध, स्पर्धा आणि आक्रमकतेचा कारक आहे. त्यामुळे दोघांच्या संयोगामुळे काही राशींना संघर्ष, गैरसमज, आणि वादविवाद यांचा सामना करावा लागू शकतो.


कर्क – मानसिक अस्थिरता, कुटुंबात वाद, खर्च वाढणे.
तुळ – नातेसंबंधात तणाव, व्यावसायिक भागीदारीत गैरसमज.
मकर – करिअरमध्ये गोंधळ, वरिष्ठांशी मतभेद.
मीन – वैचारिक द्वंद्व, गोंधळलेले निर्णय.


व्यवसाय, व्यापार आणि शेअर मार्केटवर काय परिणाम होणार?



  • जगभरातील आणि भारतातील व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागेल आणि या त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होईल.

  • भारत आणि जगातील प्रमुख देशांच्या शेअर बाजारात अस्थिरता कायम राहील आणि नुकसान होऊ शकते उलट ट्रेडिंग होऊ शकते, 

  • ट्रेडर्समध्ये भीतीदायक वातावरण निर्माण होऊ शकते, त्यामुळे import एक्सपोर्ट आणि मुद्रा घसरू शकते 

  • निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायात तात्पुरती घट होऊ शकते. त्यांना परदेशातून पैसे मिळण्यास विलंब होऊ शकतो.

  • भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेइतक्या लवकर सावरणार नाही आणि भविष्यात महागाई वाढतच राहील.

  • डॉलरचे रेट वाढू शकतात सोन्याचे भाव पडू शकतात, मंदीचे वातावरण राहील 

  • जगभरातील शेअर बाजारात व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. 

  • तुम्हाला गुंतवणूक करताना काळजी घ्यावी लागेल


सरकार ,राजकीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध



  • या काळात, भारततील विदेश विभाग आपल्या बुद्धिमत्तेचा आणि इतर कौशल्यांचा वापर करू शकणार नाही

  • मनासारखे निकाल आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळण्याची शक्यता कमी असेल 

  • नेहमी प्रमाणे महत्त्वाचे नेते चुकीच्या टिप्पण्या करताना दिसू शकतात आणि अडचणीत येऊ शकतात किंवा त्यांना माफी मागावी लागू शकते.

  • काही देश भारतासाठी समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु भारताने काळजीपूर्वक विचार करूनच कोणतेही पाऊल उचलले पाहिजे.


आयटी आणि इतर क्षेत्रे


सॉफ्टवेअर कंपन्या आणि आयटी उद्योगांमधील मंदीमुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी समस्या निर्माण होऊ शकतात त्यांचे जॉब जाऊ शकतात त्याना समस्या निर्माण होईल, प्रमोशन पगारवाढ इत्यादी मिळण्याचे मौके निसटतील असे वाटते आहे


ज्योतिषीय उपाय कोणते कराल? 



  • पक्ष्यांना पाणी आणि दाणे खायला द्या.

  • सात्विक भोजन करावे 

  • विघ्नहर्ताची आराधन करा आणि त्यांना दुर्वा अर्पण करा.

  • देव घरात आणि ऑफिसमध्ये टेबल व्हर बुध यंत्र स्थापित करा 

  • दररोज तुळशीच्या रोपाला पाणी घाला आणि त्याची पूजा करा.


काय खबरदारी घ्याल


विचारपूर्वक बोलावं – संभाषणात संयम ठेवा, शब्दांची निवड नीट करा.
निर्णय घेण्यास विलंब ठेवा – महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलल्यास चांगले.
क्रोधावर नियंत्रण ठेवा – मंगळाच्या प्रभावामुळे चिडचिड वाढू शकते.
व्यवसायात डबल-चेक करा – व्यवहार किंवा करार करताना नीट पडताळणी करा.
ध्यान आणि प्राणायाम – मानसिक शांतता राखण्यासाठी उपयुक्त.


उपाय (ज्योतिषीय दृष्टिकोनातून)


बुध आणि मंगळ दोघांनाही संतुलित करण्यासाठी “ॐ बुधाय नमः” व “ॐ अंगारकाय नमः” या मंत्रांचे जप.
हिरा (बुध) किंवा मूंगा (मंगळ) धारण करताना अनुभवी ज्योतिषीचा सल्ला घ्या.
गुरुवार आणि मंगळवार उपासना फायदेशीर ठरू शकते.


हेही वाचा: 


8 'मे' ची रात्र अद्भूत! 'या' 3 राशींचे भाग्य झटक्यात पालटणार, चंद्राचं संक्रमण करणार मालामाल


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)