Rashi Parivartan December 2022 : ग्रहांच्या राशी बदलांच्या दृष्टिकोनातून डिसेंबर महिना खूप महत्त्वाचा मानला  जातो. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या राशी बदलणे, हालचाली बदलणे आणि कोणत्याही राशीमध्ये त्यांचा वास्तव्य कालावधी याला खूप महत्त्व आहे. या सर्वांचा सर्व 12 राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. जेव्हा दोन ग्रह एका राशीमध्ये एकत्र येतात तेव्हा त्यांचे शुभ आणि अशुभ परिणाम होतात.

  


पंचांगानुसार धनु राशीमध्ये बुध आणि सूर्याची भेट होणार आहे. ग्रहांचा राजकुमार बुध 3 डिसेंबर केडू धनु राशीत दाखल झाला असून आता 16 डिसेंबरला सूर्यदेवही धनु राशीत प्रवेश करणार आहे. 16 डिसेंबरला जेव्हा बुध आणि सूर्य धनु राशीमध्ये भेटतात तेव्हा ठराविक राशीच्या लोकांचे भाग्य वाढेल. या दरम्यान त्यांना अनेक प्रकारचे फायदे होतील त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल.   


या राशीचे लोकांना होणार फायदा


वृषभ : संक्रमणाच्या वेळी या राशीच्या राशीच्या लोकांच्या कुंडलीत बुध आणि सूर्य आठव्या भावात बसतील . यामुळे त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या दरम्यान हे लोक पैसे बचत करण्यात यशस्वी होतील. जे लोक संशोधन कार्यात व्यस्त आहेत, त्यांना या काळात चांगले लाभ मिळतील.


कन्या : ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांतीच्या वेळी बुध आणि सूर्य हे दोन्ही ग्रह कन्या राशीच्या चौथ्या भावात विराजमान असतील. यामुळे मालमत्ता खरेदी होण्याची दाट शक्यता आहे. या दरम्यान त्यांची अनेक अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद येऊ शकतो. आईशी संबंध चांगले राहतील. त्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.


धनु :   बुध आणि सूर्याचे धनु राशीतील भ्रमण या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल . व्यवसायात फायदा होऊ शकतो, पदोन्नती होऊ शकते. करिअरमध्येही यश मिळू शकते.


मिथुन : या काळात या लोकांना अनेक यश मिळतील . त्यांच्या प्रेमसंबंधात बळ येईल. विवाहासाठी पात्र लोकांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. व्यवसायात लाभ होईल. नोकरीत सकारात्मकता राहील.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


संबंधित बातम्या


Vastu Tips : घरामध्ये चुकूनही असे फोटो लावू नका, कुटुंबात होतात वाद