Budh Guru Yuti : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर ग्रहांच्या राशी बदलाचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. यात आता लवकरच बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे, जिथे गुरु आधीच उपस्थित आहेत. त्यामुळे बुध प्रवेशानंतर मेष राशीत दोन्ही ग्रहांचा संयोग होणार आहे. 


मेष राशीत सुमारे 12 वर्षांनंतर या ग्रहांचा संयोग होत आहे, कारण बृहस्पतिला पुन्हा एका राशीत पुन्हा परत येण्यासाठी सुमारे 12 वर्षं लागतात. मेष राशीमध्ये गुरू आणि बुध यांच्या युतीचा 3 राशींच्या (Zodiac Signs) लोकांवर सकारात्मक परिणाम होईल.


ज्योतिष शास्त्रानुसार, बुध 26 मार्चला पहाटे 02:39 वाजता मीन रास सोडून मेष राशीत प्रवेश करेल. 9 एप्रिलपर्यंत बुध मेष राशीत राहील. या काळात होत असलेल्या बुध-ग्रह युतीचा कोणत्या राशींना बंपर लाभ मिळणार? जाणून घ्या


मेष रास (Aries)


गुरू आणि बुध यांची युती मेष राशीसाठी फलदायी ठरेल. या काळात मेष राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. तुमची निर्णय घेण्याची क्षमता खूप मजबूत असेल. तुम्ही असे काही निर्णय घ्याल ज्यामुळे तुम्हाला भविष्यात खूप फायदा होऊ शकेल. तुमचा भावंडांसोबत चांगला वेळ जाईल आणि ते तुम्हाला पूर्ण मदत करतील. या काळात तुम्हाला आरोग्याची काळजी घेण्याचीही गरज आहे. तुमचं वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफ चांगली राहील. तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. तुमच्या धन-संपत्तीत वाढ होईल.


कर्क रास (Cancer)


गुरू आणि बुध यांची युती कर्क राशीच्या दशम भावात होत आहे, त्यामुळे हा संयोग कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. कर्क राशीचे लोक नोकरी-व्यवसायात खूप यश मिळवू शकतात. यासोबतच वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर नेहमी खूश असतील. तुमचं काम आणि मेहनत पाहून त्यांना चांगलं वाटेल. या काळात वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी देऊ शकतात. यासोबतच सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील. यासोबतच तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी बुध आणि गुरूची युती फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. यासोबतच परदेशात बिझनेस करणाऱ्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. या काळात काही नवीन काम सुरू करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. ज्यांचं लग्नाचं वय आहे त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो, बाकीच्यांचं वैवाहिक जीवन आनंदी राहील. यासोबतच लव्ह लाईफही चांगली असणार आहे. समाजात मान-सन्मान देखील वाढेल. तुम्हाला मुलांकडूनही आनंद मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : येणारे 294 दिवस 'या' राशींवर राहणार शनींची अपार कृपा, वाढणार धन-दौलत; तर 5 राशींना बसणार शनीच्या वाईट दृष्टीचा फटका