Budh Grah Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटलं जातं. बुध (Mercury) ग्रह वाणी, व्यापार, शेअर मार्केट आणि अर्थव्यवस्था इत्यादींचा कारक मानला जातो. बुध ग्रह 19 जुलै रोजी रात्री 08 वाजून 48 मिनिटांनी सूर्याची रास म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचं सिंह राशीत प्रवेश केल्याने बुध ग्रह अधिक बलवान होणार आहे. 


ज्योतिष शास्त्रात, बुध आणि सूर्य ग्रहांच्या मध्ये मैत्रीपूर्ण भाव आहे. त्यामुळे बुध ग्रहाचं संक्रमण काही राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल होऊ शकतात. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं संक्रमण फार लाभदायक ठरणार आहे. बुध ग्रहाच्या संक्रमणाने तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या बुद्धीमत्तेने तुम्ही यश संपादन कराल. तसेच, व्यापारी वर्गाला व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन तुमचं पूर्वीपेक्षा चांगलं असणार आहे. तुमच्या जीवनात आर्थिक स्थिरता येण्याची शक्यता आहे. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


बुध ग्रहाचं संक्रमण धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणण्याची शक्यता आहे. या दरम्यान तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच, या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना सुद्धा अनेक लाभाच्या संधी मिळतील. जर तुम्हाला धार्मिक यात्रेला जायचं असेल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होईल. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं राशी परिवर्तन फार शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या साहस आणि आत्मविश्वासात वाढ झालेली दिसून येईल. बहिण-भावाच्या सहकार्याने तुम्हाला कामात यश मिळेल. तुमच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shani Dev : शनीची वक्री चाल सुरु! पुढचे 139 दिवस 'या' राशी राहणार टेन्शन फ्री, अडचणींपासून राहाल चार हात लांब