Budh Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, व्यवसायाचा दाता बुध ग्रह (Mercury) 23 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजून 13 मिनिटांनी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाचं हे संक्रमण तीन राशींच्या लोकांसाठी फार लाभदायी ठरणार आहे. या राशींच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात चांगलं यश मिळेल. या शुभ राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं संक्रमण फार अनुकूल ठरणार आहे. या राशीच्या लग्न भावात आणि चौथ्या भावात हे संक्रमण होणार आहे. त्यामुळे विवाहाशी संबंधित तुमच्या समस्या दूर होतील. जोडीदाराचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. त्याचबरोबर, कोणतंही काम करताना सावधानता बाळगा. अन्यथा कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकतं.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी बुध संक्रमणाचा काळ फार अनुकूल असणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती दिसून येईल. समाजात मान-सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. उत्पन्नात वाढ होईल. मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला तुमची कामे सहज साध्य करता येतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. या राशीच्या पाचव्या आणि आठव्या भावाचा स्वामी ग्रह होऊन बुध ग्रह चौथ्या भावात प्रवेश करणार आहे. या राशीच्या लोकांना भौतिक सुखाचा लाभ घेता येईल. तसेच, कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल. या दरम्यान जर तुम्हाला नवीन कामाची सुरुवात करायची असल्यास तुम्ही करु शकता. त्यात कोणताच अडथळा येणार नाही. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याच्या बाबतीत देखील सतर्क असणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :