Budh Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध (Mercury) ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हणतात. तसेच, बुध ग्रह शिक्षण, विद्या, वाणी, व्यवसायाचा कारक ग्रह मानला जातो. बुध ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात त्यानंतर नक्षत्र परिवर्तन देखील करतात. याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. 

माहितीनुसार, 7 मे रोजी बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. या दिवशी बुध पापी ग्रह केतूच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांचं भाग्य उजळू शकतं. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वैदिक पंचांगानुसार, व्यवसायाचा दाता बुध ग्रह 7 मे रोजी पहाटे 4 वाजून 13 मिनिटांनी अश्विनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. जवळपास 7 दिवस तो याच राशीत असणार आहे. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीत बुध ग्रह आठव्या राशीत विराजमान आहे. अश्विनी नक्षत्रात प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, वडिलोत्पार्जित संपत्तीचा देखील तुम्हाला लाभ मिळेल. तुमच्या करिअरमध्ये तुमच्या कुटुंबियांचा पूर्ण सपोर्ट तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच, मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी कामे पूर्ण करता येतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

अश्विनी नक्षत्रात प्रवेश करुन तूळ राशीच्या सहाव्या चरणात बुध ग्रह असणार आहे. या दरम्यान या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. तसेच, परदेशात जाण्याच्या विविध संधी तुमच्यासमोर उपलब्ध होतील. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ चांगला जाईल. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या ध्येयावर तुम्ही लक्ष केंद्रित कराल. 

मेष रास (Aries Horoscope)

बुध ग्रह अश्विनी नक्षत्रात प्रवेश करत असल्याने अनेक क्षेत्रात तुम्हाला याचा लाभ मिळेल. तसेच, अनेक शुभ योग या काळात जुळून येतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्ही या काळात पूर्ण करु शकतात. तसेच, नशिबाची चांगली साथ तुमच्याबरोब असेल. पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:                                             

May 2025 Monthly Horoscope : मे महिन्यात 5 राशींना लागणार लॉटरी, महिन्याच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; वाचा मासिक राशीभविष्य