Budh Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह धन, व्यापार, बुद्धी, वाणी, तर्क, संवादाचे कारक आहेत. सध्या बुध मेष राशीत आहे. 31 मे रोजी दुपारी 12:20 वाजता बुध आणि वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. बुध राशीच्या बदलामुळे मोठे बदल होणार आहेत. याचा परिणाम 12 राशींवर दिसून येईल. पण 4 राशींवर (Zodiac Sign) त्याचा नकारात्मक प्रभाव पडणार आहे. 31 मे ते 14 जून या कालावधीत बुध वृषभ राशीत (Taurus Horoscope) असेल. या राशीच्या लोकांच्या आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर आणि करिअरवर विपरीत परिणाम होऊ शकतो. जून महिन्याच्या 15 दिवसांमध्ये कोणत्या राशीच्या लोकांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण चांगलं नसणार आहे. या लोकांचे गुप्त शत्रू सक्रिय राहतील आणि मोठे नुकसान करू शकतात. या काळात कोणाशीही वाद घालण्याची किंवा कोणाचाही अपमान करण्याची चूक करू नका. तुमची फसवणूक होण्याची किंवा कोणत्याही व्यवहारात चूक होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. तसेच, तुमच्या खर्चात वाढ होईल. बजेट बिघडल्याने कर्ज घेण्याची गरज भासू शकते. 


तूळ रास (Libra Horoscope)


बुधाच्या राशीतील बदलामुळे तूळ राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका. साईड इफेक्ट्स होऊ शकतात. याशिवाय तुमच्या कुटुंबातील कोणीतरी तुमचे नुकसान करू शकते. अडचणींपासून सुरक्षित राहायचे असेल तर कोणाशीही वाद घालू नका. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


बुधाचे संक्रमण तुम्हाला त्रास देऊ शकते. विरोधक आणि शत्रूंपासून दूर राहा. कोणीतरी तुमच्या विरोधात कट रचू शकते. तुमची योजना कुणालाही सांगू नका. अन्यथा सुरू असलेले काम बिघडू शकते आणि तुमचे नुकसान होऊ शकते. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


बुधाचे संक्रमण धनु राशीच्या लोकांना या 15 दिवसात अडचणींत वाढ होऊ शकते. पैशांचे व्यवहार करताना विचारपूर्वक करा. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचे नुकसान होऊ शकते. ही वेळ संयमाने घ्या. तसेच, आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : अवघ्या काही तासांतच सुरु होतोय 'पंचक काळ', सर्व 12 राशींना सावधानतेचा इशारा; चुकूनही 'या' गोष्टी करू नका, आयुष्यभर होईल पश्चाताप