Budh Asta In Taurus Horoscope : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ज्याप्रमाणे वेळेनुसार राशी परिवर्तन करतात. त्याचप्रमाणे ग्रहांचा उदय आणि अस्तदेखील होतो. ग्रहांच्या हालचाली बदलण्याचा सर्व 12 राशींवर मोठा परिणाम होतो. 2 जून रोजी बुध ग्रहाचा अस्त (Budh Asta) होणार आहे. बुधाचा अस्त अनेक राशींवर (Horoscope) अशुभ परिणाम करणार आहे. 


बुध वृषभ राशीत (Taurus Horoscope) अस्त करणार आहे आणि त्यानंतर 29 जूनला बुध गोचर करणार आहे. बुध ग्रहाच्या स्थितीतील बदलामुळे 3 राशीच्या लोकांना त्रास होऊ शकतो. या लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते आणि त्यांच्या करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. बुध ग्रहणामुळे कोणत्या राशींचे (Zodiac Sign) नुकसान होण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


तूळ रास 


बुध ग्रहाच्या अस्ताने तूळ राशीच्या लोकांच्या समस्येत वाढ होऊ शकतात. या राशीचे लोक दिर्घकालीन आजाराने त्रस्त होऊ शकतात. या काळात वाहन चालवताना काळजी घ्या. तसेच, या दरम्यान तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यांच्याबरोबर वागणूक चांगली ठेवा. पैशांचा अनावश्यक वापर करू नका. जपून पैसे वापरा. 


वृश्चिक रास 


बुध ग्रहाच्या अस्ताचा सामना वृश्चिक राशीच्या लोकांना देखील करावा लागू शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार नाही. तुमचं चांगलं चाललेलं काम बिघडू शकते. तुमच्या कामात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. करिअरमध्ये अनेक संकटं येऊ शकतात. तसेच, जोडीदाराबरोबर तुमचे वादही होऊ शकतात. त्यामुळे जोडीदाराशी चांगला संवाद साधा. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. या काळात कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका. 


मीन रास 


मीन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं अस्त फार नुकसानकारक ठरू शकते. याचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या तब्येतीवर दिसून येईल. त्यामुळे तुमच्या तब्येतीची योग्य काळजी घ्या. त्याचबरोबर वाहन चालवताना काळजी घ्या. या काळात शनीची साडेसाती देखील आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना नीट विचार करा. नोकरीत नवीन बदल आणण्यासाठी तसेच, दुसरी नोकरी निवडण्यासाठी हा काळ योग्य नाही. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


June Month Numerology Horoscope : 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी जून महिना ठरणार वरदान; दररोज मिळणार चांगली बातमी, धन-संपत्तीतही होईल वाढ