Bring Good Luck in New Year : ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) मानवाच्या आयुष्यावर ग्रह आणि नक्षत्रांचा प्रभाव असतो. ग्रहांची दशा बरोबर नसेल तर व्यक्तीला लाख प्रयत्न करूनही यश मिळत नाही. ज्योतिष शास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे जीवनातील प्रत्येक समस्या दूर होऊ शकतात. जर तुम्ही कोणत्याही आर्थिक संकटाशी झुंज देत असाल तर लक्ष्मीमातेची आराधना करा. ज्योतिष शास्त्रामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय सांगितले आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात श्रीयंत्र बसवणे खूप शुभ मानले जाते. नवीन वर्षात लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी काय उपाय करता येतील ते जाणून घ्या.


देवी लक्ष्मीला प्रिय आहे श्रीयंत्र


धनसमृद्धीसाठी देवी लक्ष्मीची आराधना केली जाते. श्रीयंत्राला श्री लक्ष्मी यंत्र असंही म्हणतात. श्रीयंत्र हे धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीला प्रिय आहे. हे अत्यंत प्रभावी आणि शुभ साधन मानले जाते. श्री महालक्ष्मी यंत्राची प्रतिष्ठापना केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मानलं जातं. ज्या घरात श्रीयंत्र स्थापन केलं जाते तिथे धन, समृद्धी आणि यश मिळते. श्रीयंत्राच्या स्थापनेमुळे तुमच्यावर सदैव देवी लक्ष्मीची कृपा आणि आशिर्वाद राहतो. श्रीयंत्रामध्ये 9 मुख्य आणि 45 लहान कोन आहेत. त्याची नऊ चक्रे नऊ देवींचे प्रतीक आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, घरामध्ये श्रीयंत्र स्थापित केल्याने पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.


घरी श्रीयंत्राची प्रतिष्ठापना कशी करावी?


घरामध्ये धन आणि सुख समृद्धी मिळविण्यासाठी तुम्ही नवीन वर्षात घरात संपूर्ण विधीपूर्वक श्रीयंत्राची स्थापना करा. सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा. यानंतर श्रीयंत्राला पंचामृत आणि गंगाजलाने स्नान घाला. 'ओम श्री ह्रीं श्री नमः किंवा ओम श्री ह्रीं श्री' या मंत्राचा जप करत राहा. घराच्या ईशान्य कोपर्‍यात लाल कपडा ठेवून श्रीयंत्राची स्थापना करा. याच्या बाजूला कलशाची स्थापना करा. यानंतर श्रीयंत्रावर कुंकू अर्पण करा. श्रीयंत्राची प्रतिष्ठापना करताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे हे ध्यानात ठेवा.


( टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ) 


महत्त्वाच्या इतर बातम्या


Numerology : 'या' तारखेला जन्मलेले लोक धनसंपत्तीच्या बाबतील असतात खूप भाग्यवान, सदैव असतो कुबेराचा आशीर्वाद