Baba Vanga : जगप्रसिद्ध भविष्यकार बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी 2025 या वर्षाच्या संदर्भात हादरवून टाकणाऱ्या अनेक भविष्यवाणी सांगितल्या आहेत. ज्या खऱ्याही ठरतायत. त्याचबरोबर, त्याबाबत ऐकून तुम्हाला भीतीही वाटू शकते. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीमध्ये कोणकोणत्या राशींना सावध राहण्याची गरज आहे याबाबतही सांगण्यात आलं आहे.
बाबा वेंगाची भविष्यवाणी
बाबा वेंगा यांनी 2025 च्या भविष्यवाणीविषयी देखील सांगितलं आहे. यामध्ये त्यांनी कोणकोणतं भाकित केलं आहे. तसेच, कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- बाबा वेंगा यांच्या मते, मानवतेचं अंतिम पतन आणि जागतिक विनाशाची सुरुवात 2025 पासून सुरg होईल. याचा अर्थ असा की 2025 पासून अशा घटना सुरू होतील ज्यामुळे विनाश होईल.
- त्यामुळे येणाऱ्या वर्षांत मानवतेच्या अंताची सुरुवात होईल, मानवतेचा विनाश होईल असंच समजा.
- बाबा वेंगा म्हणाले की, येत्या 4 वर्षांत आपण नैसर्गिक संसाधनांचा इतका जास्त वापर करू की अधिक ऊर्जेसाठी ते आपल्यासाठी एक समस्या ठरतील.
- बाबा वेंगा यांनी 2025 सालाबद्दल लोकांना आशावादाचे कोणतेही आश्वासन दिलेले नाही. याऊलट त्यांनी सांगितलेल्या भविष्यवाणीमध्ये,जगभरातील लोकांना जैविक हल्ल्यांपासून ते आर्थिक मंदीपर्यंत सर्व गोष्टींचा सामना करावा लागू शकतो असाच सूचक संदेश दिला आहे.
'या' राशींना सर्वात जास्त धोका
बाबा वेंगा यांनी सांगितलेल्या भविष्यवाणीमध्ये काही राशींचा समावेश आहे. या राशींना पुढच्या सहा महिन्यात सावध राहण्याची गरज आहे.
मेष रास (Aries Horoscope)
लवकरच शनी वक्री चाल करणार आहेत. या काळात मेष राशीच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः मानसिकदृष्ट्या अस्थिरता जाणवू शकते. आरोग्याच्या समस्या आणि कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात.
वृश्चिक (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही शनी वक्री काळ कठीण असू शकतो. या काळात तुम्हाला मानसिक ताण आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठीही वर्षाच्या सुरुवातीला काही अडचणी येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आणि आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.
कर्क आणि वृश्चिक
या दोन राशींवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव असेल. त्यामुळे, या काळात आरोग्याची आणि आर्थिक परिस्थितीची काळजी घेणे आवश्यक आहे.
कुंभ, मीन आणि मेष
या राशींना शनीच्या साडेसातीचा प्रभाव जाणवेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :