Weekly Horoscope 29 December 2025 To 4 January 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 वर्षाचे शेवटचे अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तसेच, अवघ्या काही दिवसांतच नवीन आठवड्याला सुरुवात होणार आहे. हा नवीन आठवडा अनेक राशींचं भाग्य उजळणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे हा नवा आठवडा अनेक राशींसाठी (Zodiac Signs) भाग्यशाली असणार आहे. डिसेंबरचा शेवटचा आणि जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

Continues below advertisement

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीसाठी नवीन आठवडा रोमांचकारी असणार आहे. या कालावधीत कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. अन्यथा तुमचे निर्णय चुकू शकतात. या कालावधीत तुमच्या करिअरला वेगळी संधी देण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. हाती घेतलेलं कार्य तुम्हाला वेळेत पूर्ण करावं लागेल. मनाविरुद्ध गोष्टी घडत असतील तर त्यावर लगेच रिअॅक्ट करु नका. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा थोडाफार संथ गतीने चालणारा असणार आहे. तुमच्या वागण्यात खरेपण ठेवा. तसेच, या आठवड्यात पैशांची गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ असणार आहे. जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला या आठवड्यात पार्टनर भेटण्याची शक्यता आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी देखील मिळण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या कालावधीत तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अनेक लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी वेळीच माणसं ओळखायला शिका. तसेच, कोणत्याही कामात हलगर्जीपणा करु नका. महत्त्वाच्या कामांना आधी प्राधान्य द्या. कुटुंबियांबरोबर छान वेळ घालवा.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीसाठी नवीन आठवडा लाभदायी ठरणार आहे. याचं कारण म्हणजे, नवीन वर्षात मकर राशीच्या लोकांवर असलेली शनिची साडेसाती लवकरच संपुष्टात येईल. त्यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करु शकता. तसेच, कोर्ट कचेरीच्या संदर्भातील जुने वाद मिटतील. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढलेला दिसेल. तसेच, प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा थोडा कष्टदायी असेल. पण, जानेवारीची सुरुवात मात्र, तुमच्या मनासारखी होईल. या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायात, करिअरमध्ये नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, अनेक रखडलेली कामे देखील तुम्ही पूर्ण करु शकता.अनावश्यकपणे तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवा.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीसाठी नवीन आठवड्याची सुरुवात सकारात्मक असणार आहे. या कालावधीत ग्रहांच्या हालचालींचा शुभ परिणाम तुमच्या राशीवर पडताना दिसून येईल. हातात घेतलेलं कार्य वेळेत तुम्ही पूर्ण कराल. तसेच, पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ फार लाभदायी असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. मात्र,मानसिक शांतीसाठी योग आणि ध्यान गरजेचं आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी डिसेंबरचा शेवटचा आणि नवीन वर्षाचा पहिला आठवडा नशीब पालटणारा! पैसा, नोकरी, करिअर? साप्ताहिक राशीभविष्य