Vastu Tips For Parrot : आपल्यापैकी अनेकांना प्राणी, पशु-पक्ष्यांची आवड असते. अनेकदा आपल्या आजूबाजूला राहणारे शेजारी, नातेवाईक, मित्र-मंडळी यांच्या घरात कुत्रा, मांजर, ससा, कासव, मासे, पोपट, पक्षी असे अनेक पाळीव प्राणी पाळताना पाहिलं आहे. असं म्हणतात, की पाळीव प्राण्यांचं संगोपन केल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. 


काही लोकांना पोपट (Parrot) पाळायला फार आवडतो. मिठू मिठू बोलणारा पोपट सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित करून घेतो. पण, अनेकदा लोकांना असा प्रश्न पडतो की घरात पोपट पाळणं शुभ आहे की अशुभ? खरंतर, वास्तूशास्त्रात पोपटाशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत. मान्यतेनुसार, वास्तूच्या नियमानुसार, घरात पोपट पाळल्याने सुख-समृद्धीत चांगली भरभराट होते. घरात पोपट पाळण्याचे वास्तू नियम नेमके कोणते आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


पोपट पाळणं शुभ की अशुभ?



  • वास्तूनुसार, घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला पोपट पाळणं शुभ मानलं जातं. 

  • जर तुम्ही पोपट पिंजऱ्यात ठेवत असाल तर तो खुश आहे की नाही या गोष्टीची नीट खात्री करून घ्या. कारण अशी मान्यता आहे की, पिंजऱ्यामध्ये पोपट जर खुश नसेल तर घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते. 

  • या व्यतिरिक्त घरात पोपटाचा फोटो लावणंदेखील शुभदायक मानलं जातं. यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते. 

  • घरात पोपट आणल्यानंतर त्याची विशेष काळजी घ्या. मान्यतेनुसार, असे केल्याने फार शुभ परिणाम मिळतात. तसेच, जीवनात आनंद टिकून राहतो. 


कोणत्या परिस्थितीत पोपट पाळणं शुभ?


अशी मान्यता आहे की, घरात पोपट पाळल्याने राहू-केतू आणि शनीच्या दुष्प्रभावांना कमी करता येते. ज्योतिष शास्त्रानुसार, घरात पोपट पाळल्याने अनेक रोगांपासून सुटका होते. तसेच, पोपट घरात ठेवल्याने लहान मुलांचं अभ्यासात मन रमतं. तसेच, घरात पोपट ठेवल्याने पती-पत्नीच्या नात्यात अतूट बंध निर्माण होतात. 


कोणत्या परिस्थितीत पोपट पाळणं अशुभ? 


अशी मान्यता आहे की, जर तुम्ही घरात ठेवलेला पोपट खुश नसेल तर घरात अनेक वाद निर्माण होतात. तसेच, घरातील सदस्यांना पैशांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. आर्थिक तंगी भासते. घरात सतस वादविवाद झाल्यास पोपट जर त्याच गोष्टी वारंवार बोलून दाखवत असेल तर अशा वेळी पोपट पाळणं हे अशुभ संकेत देतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : पुढचे तब्बल 254 दिवस 'या' 3 राशी राहतील हॅप्पी-हॅप्पी; शनीचं कुंभ राशीत संक्रमण देणार मोठ्ठं सरप्राईज