Astrology Travel Tips : आपल्यापैकी अनेकांना प्रवास (Travel) करायला आवडतो. तसं पाहिलं तर, प्रवासात येणारे विविध अनुभव आपल्याला आयुष्य (Life) जगण्यासाठी मदत करतात. पण बहुतेक वेळा आपण प्रवासाला निघण्याआधी खूप प्लॅनिंग करतो, पण तरीही काही अडथळे वाटेत येतात आणि आपण आपला प्रवास सहजपणे पूर्ण करू शकत नाही.
हिंदू (Hindu) धर्मात ज्याप्रमाणे कोणतंही शुभ काम करण्यापूर्वी काही प्रथा चालवल्या जातात, त्याचप्रमाणे प्रवासाला जाताना घरातून बाहेर पडताना सुरक्षित प्रवासासाठी काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुमचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी घरातून बाहेर पडताना कोणत्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
घरातून बाहेर पडण्याआधी या गोष्टी पाळा
अशा अनेक गोष्टी वास्तू शास्त्रात सांगण्यात आल्या आहेत, ज्या केल्याने आपला प्रवास सुखकर होतो आणि कोणते अडथळे येत नाहीत. कोणत्याही महत्त्वाच्या कामात यश मिळवण्यासाठी घरातून बाहेर पडताना करायचे हे उपाय अतिशय उपयुक्त आहेत. प्रवास यशस्वी आणि आनंददायी करण्यासाठी महत्वाचे नियम जाणून घ्या –
1) घरातून बाहेर पडताना नेहमी शुभ आणि चांगले शब्द वापरा. कोणाशी वाद घालू नका किंवा कुणावर रागवू नका आणि कुणालाही शिवीगाळ करू नका.
2) प्रवासाला निघताना वडिलांचे आशीर्वाद घ्या आणि मगच घराबाहेर पडा. वडिलांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांमुळे मार्गातील अडथळे दूर होतात, असं मानलं जातं.
3) जर तुमचा प्रवास यशस्वी व्हावा आणि शुभ व्हावा असं वाटत असेल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी आराध्य देवतेला दिवाबत्ती करा आणि प्रवास शुभ होण्यासाठी प्रार्थना करा. यानंतर, सर्व अडथळ्यांचा नाश करणाऱ्या भगवान गणेशाच्या पाया पडा किंवा आपल्या प्रिय देवतेचं नाव घेऊनच घर सोडा.
4) प्रवासापूर्वी शकुन-अपशकुनांची विशेष काळजी घ्यावी. जसं की, जर तुम्ही प्रवासासाठी घर सोडत असाल आणि वाटेत समोरुन कोणी शिंकलं तर तुम्ही थोडा वेळ थांबा आणि मगच प्रवासासाठी पुढे निघा.
5) प्रवासाला जाताना जर तुम्हाला वाटेत एखादं मंदिर, पवित्र झाड, गाय, बैल, आई-वडील, आजी-आजोबा किंवा गुरुजी भेटले तर त्यांना नमस्कार करुन उजवीकडे सोडून पुढे जा. असं केल्याने प्रवास शुभ आणि यशस्वीपणे पार पडतो.
6) कोणत्याही प्रवासासाठी निघण्याआधी दिशेकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. सोमवारी आणि शनिवारी पूर्वेला, मंगळवारी आणि बुधवारी उत्तरेला, रविवार आणि शुक्रवारी पश्चिमेला, त्याचप्रमाणे गुरुवारी दक्षिण दिशेला दिशाशूल मानला जातो. असं मानलं जातं की, त्या दिशेने प्रवास करताना व्यक्तीला अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: