Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या कुंडलीत असे काही ग्रह असतात ज्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या नशिबाचा, भविष्याचा अंदाज लावता येतो. अशाच कुंडलीतील काही शुभ ग्रहांविषयी जाणून घेऊयात. 

1. राज योग 

ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीत जेव्हा लग्न आणि भाग्य केंद्र आणि त्रिकोण चरणाचे स्वामी ग्रहांची स्थिती शुभ असेल तेव्हा राज योग निर्माण होतो. या योगात व्यक्तीला राजा बनविण्याची क्षमता असते. या व्यक्तिरिक्त सुख, प्रसिद्धी आणि अधिकार या योगामुळे मिळतो. राज योगाच्या प्रभावाने व्यक्ती समाजात मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकतात. 

2. धन योग 

आपल्या कुंडलीत धन योग तेव्हा निर्माण होतो जेव्हा द्वितीय, पंचम आणि नवम या एकादश चरणाचे स्वामी ग्रह शुभ स्थितीत असतात. आपल्या आयुष्यात जी काही आर्थिक प्रगती होते त्यासाठी धन योग कारणीभूत असतो. हा योग असलेले व्यक्ती धन, संपत्ती आणि भौतिक सुख-सुविधांचे कारक असतात. 

3. गजकेसरी योग

गजकेसरी योग व्यक्तीला बुद्धिमान, आदर्शवादी आणि सन्मानपूर्वक असतो. जेव्हा आपल्या कुंडलीत बृहस्पती आणि चंद्र ग्रह केंद्र चरणात असतात. तेव्हा गजकेसरी योग निर्माण होतो. हा योग असलेले व्यक्ती आयुष्यात आपल्या मेहनतीने आणि कलागुणांनी आयुष्यात यश संपादन करतात. 

4. विपरीत राज योग 

जेव्हा पाप ग्रह 6,8 किंवा 12 चरणात असताना शुभ फळ प्राप्त होते तेव्हा विपरीत राज योग निर्माण होतो. हा योग कठीण मधल्या कठीण परिस्थितीत सुद्धा व्यक्तीला यश प्राप्त करुन देतो. या योगाचे लोक कठीण संघर्षानंतर चांगलं यश संपादन करतात. 

5. धर्म कर्माधिपती योग 

जेव्हा कुंडलीत नवव्या आणि दहाव्या चरणाचे स्वामी ग्रह एकत्र येतात. तेव्हा धर्म कर्माधिपती योग जुळून येतो. हा योग व्यक्तीला उच्च पद, भाग्य आणि यश देतो. या योगामुळे व्यक्तीला जीवनात अचानक धनलाभ होतो. 

निष्कर्ष 

या सर्व योगांचा परिणाम जन्म कुंडली आणि ग्रहांच्या स्थितीवर आधारित आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                        

August 2025 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा महिना कसा असणार? कोणावर असणार शंकराची कृपा? मासिक राशीभविष्य