Sun Mars Conjunction : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती वेळोवेळी बदलते. ग्रहांची स्थिती बदलल्याने शुभ आणि राजयोग (Rajyog) निर्माण करतात. याचा परिणाम मानवी जीवनासह देश विदेशावर होतो. 25 डिसेंबर, रोजी सूर्य आणि मंगळ ग्रह एकत्र आल्यामुळे शुभ योग जुळून येणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि मंगळ ग्रह लाभदायी ठरु शकतो. या राशीच्या लोकांना वेळोवेळी धनलाभ मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायात चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. त्याचबरोबर तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे परत मिळतील. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागेल.  


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


सूर्य आणि मंगळ ग्रहाच्या युतीने  वृश्चिक राशीच्या लोकांना अनेक शुभ परिणाम मिळतील. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला धार्मिक किंवा मंगलमय कार्यात देखील सहभागी होण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनातील लोकांसाठी हा काळ चांगला असेल. तसेच, परदेशी यात्रा तुमची यशस्वी ठरले. या काळात तुमची आध्यात्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि मंगळ ग्रहाची युती फार लाभदायक ठरेल. या काळात तुमच्या व्यवसायात चांगला लाभ मिळेल. तसेच, जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर त्यातून तुम्हाला लाभ मिळेल. त्याचबरोबर या आठवड्यात नवीन व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. या काळात तुम्ही पैशांची गुंतवणूक देखील करु शकता. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :                     


Weekly Horoscope 23 To 29 December 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य