Astrology : आज  शनिवार, 18 मे रोजी, शनी (Lord Shani) आपल्या मूलत्रिकोण राशीत म्हणजेच कुंभ राशीत (Aquarius Horoscope) आहे त्यामुळे शश राजयोग (Rajyog) तयार झाला आहे. तसेच, शनी आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची दहावी तिथी असून या दिवशी शशायोगाबरोबरच रवियोग, हर्ष योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोगही होतोय. वैदिक ज्योतिषानुसार, मिथुन, सिंह आणि मकर राशींसह 5 राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे. आर्थिक बाबतीत आजचा दिवस या राशींसाठी चांगला असणार आहे. या भाग्यवान राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. मिथुन राशीच्या लोकांना आज कामात मोठं यश मिळेल. तसेच, व्यवसायात नवीन प्रकल्प सुरु करण्याची चांगली संधी असेल. त्यामुळे तुम्ही व्यवसायात चांगला नफा कमवू शकता. नोकरदार लोक आज आपली कामे वेळेवर पूर्ण करतील. अविवाहित लोक त्यांच्या नात्याबद्दल बोलू शकतात. तुम्ही तुमच्या पालकांबरोबर चांगला वेळ घालवाल.


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. आज तुमच्यावर शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या आणि अडथळे दूर होतील. आज नशिबाची साथ तुमच्या बाजूने असेल. तसेच, आज व्यावसायिकांना मोठी डील मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल. तुमचे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. वृश्चिक राशीचे लोक प्रत्येक काम स्पष्टतेने आणि कठोर परिश्रमाने करतील. तसेच, लोकांच्या नजरेत तुमची प्रतिमा देखील सुधारेल.  नोकरी व्यावसायिक आणि व्यावसायिकांसाठी उत्पन्नाचे स्रोत वाढतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. मकर राशीच्या लोकांना आज उच्च ध्येय गाठण्याची चांगली संधी मिळू शकते. तुमची करिअरमधील परिस्थिती देखील खूप मजबूत असेल. व्यापारी वर्ग आज दिवसभर आपल्या व्यवसायात व्यस्त राहतील, ज्यामुळे तुम्ही तुमची कमाई दुप्पट करू शकता. या राशीचे लोक ज्यांना नोकरी, प्रवास किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे, त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. तसेच, तुमचे आरोग्य पूर्णपणे चांगले राहील.


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ फळ देणारा आहे. आजचा तुम्ही नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी सक्षम असाल. चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सकस आहार आणि व्यायामाचा समावेश करावा. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवाल आणि तुमच्या भावना एकमेकांबरोबर शेअर कराल. तुमच्या वडिलांच्या मदतीने नवीन वाहन किंवा जमीन खरेदी करण्याची तुमची इच्छा उद्या पूर्ण होऊ शकते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Horoscope Today 18 May 2024 : आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! अनेक शुभ योगांसाह शनीही होतील प्रसन्न; वाचा 12 राशींचं आजचं राशीभविष्य