Astrology Panchnag Yog 15 February 2025 : आज 15 फेब्रुवारीचा दिवस म्हणजेच शनिवारचा दिवस आहे. आजचा दिवस हा शनीदेवाला समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी तृतीया तिथीचा शुभ संयोग (Yog) जुळून आला आहे. आज देवी लक्ष्मीच्या कृपेने धन योग आणि शश योग यांसारखे शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे आजचा दिवस हा फार खास असणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुमच्या भौतिक सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा विकास होईल. तर, बिझनेसमध्ये तुमची चांगली प्रगती होईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. आज तुम्ही हाती घेतलेलं महत्त्वाचं काम देखील पूर्ण होणार आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येतील. तुमची निर्णयक्षमता चांगली दिसून येईल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक बदल घडवून आणणारा असणार आहे. आज समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तुमच्या कामाचं बॉसकडून कौतुक केलं जाईल. तसेच, सहकारीही तुमच्या कामाने प्रभावित होतील. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. इतकंच नव्हे तर, आज तुम्ही नवीन गोष्टींमध्ये पैशांची गुंतवणूकदेखील करु शकता. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज गरजूंना मदत केल्याने तुम्हाला चांगलं पुण्य फळ मिळेल. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच, सामाजिक कार्यात तुम्ही सक्रिय राहाल. आज तुम्हाला विविध स्त्रोतांमधून अचानक धनलाभ होईल. त्यामुळे तुम्ही फार आनंदी असाल. भविष्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज सामाजिक क्षेत्रात तुमचा चांगला विकास होईल. भौतिक सुख-सुविधांचा लाभ घ्याल. तसेच, आज तुमची तुमच्या मित्र-परिवाराबरोबर भेट होईल. त्यामुळे जुन्या आठवणींना चांगला उजाळा मिळेल. तुमचं आरोग्यदेखील एकदम ठणठणीत असणार आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:   

Mangal Margi 2025 : अवघ्या काही दिवसांत मंगळ ग्रहाचा पॉवरफुल अटॅक; 'या' 3 राशींना सावधानतेचा इशारा, 24 तास राहा सतर्क