Astrology Panchang Yog 9 February 2025 : आज 9 फेब्रुवारी म्हणजेच रविवारचा दिवस आहे. आजच्या दिवशी बुधादित्य योग (Yog) जुळून येणार आहे. तसेच, द्वादशी आणि आर्द्रा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून येणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना चांगलाच लाभ मिळणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात चांगलं वातावरण निर्माण होईल. तसेच, तुम्ही हाती घेतलेलं कार्य पूर्ण होईल. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुम्हाला विविध स्त्रोतांमधून तुम्हाला चांगला धनलाभ मिळेल. तसेच, तुमच्या मेहनतीला चांगलं  फळ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. भविष्यासाठी पैसे तुम्ही गुंतवू शकता. लवकरच तुम्हाला शुभवार्ता मिळेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मित्र-परिवाराबरोबर भेटीगाठी होतील त्यामुळे तुम्हाला फार प्रसन्न वाटेल. तसेच, जुन्या आठवणींना उजाळा द्याल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच तुमचं वैवाहिक जीवन आनंदी असेल. दिवसाच्या शेवटी तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रसन्नतेचा असणार आहे. आज सकाळपासूनच तुम्ही फार उत्साही असाल. तुम्ही हाती घेतलेलं काम लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असून देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. आज तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उपलब्ध होतील. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. लवकरच तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला तुमच्या कामातून आनंद मिळेल. आज तुम्हाला एखादी महत्त्वाची डील मिळेल. यामधून देखील तुम्हाला चांगला लाभ मिळेल. लवकरच तुमच्या घरात एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 9 February 2025 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभिष्य