Astrology Panchang Yog 7 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 7 जुलैचा दिवस आहे. आजचा वार सोमवार आहे. आजपासून नवीन आठवड्याला सुरुवात झाली आहे. तसेच, आजचा दिवस हा भगवान शंकराला (Lord Shiva) समर्पित आहे. त्याचबरोबर लवकरच सूर्य ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. तसेच, आज चंद्राने वृश्चिक राशीत संक्रमण केलं आहे. आजच्या दिवशी बुध आश्लेषा नक्षत्र, चंद्राधि योग तसेच सर्वार्थ सिद्धी योगासारखे (Yog) अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या शुभ दिवसाचा लाभ काही राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजच्या दिवसाचं महत्त्व फार आहे. कारण आजच्या दिवशी तुम्ही ठरवलेली कामे नियोजित वेळेत पूर्ण होतील. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसून येईल. नवीन गोष्टी शिकण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात देखील तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या काळात गुंतवणूक करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस उमेदीचा असणार आहे. आज तुम्हाला मानसिक शांती लाभेल. तसेच, धार्मिक यात्रेला जाण्याचा योग लवकरच जुळून येणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चांगला चालेल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. आज तुम्ही नवीन गोष्टी शिकून घ्याल. बाहेर फिरायला जाण्याची संधी मिळेल. तसेच, तुमच्या कामाने तुम्ही इतरांना प्रभावित कराल. भौतिक सुख-संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. एकूणच तुमच्यासाठी आजचा दिवस फार अनुकूल असणार आहे. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस कमाईचा असणार आहे. आज तुम्हाला अनपेक्षित धनलाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर जाण्याची संधी मिळू शकते. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज राजकारणात तुम्ही सक्रिय असाल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तसेच, नवीन लोकांशी तुमच्या भेटीगाठी वाढतील. लहान मुलांकडून तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. 

हेही वाचा :                          

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 7 July 2025 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं रक्षण करतील बाबा भोलेनाथ; मनातील इच्छा होईल पूर्ण, आजचे राशीभविष्य