Astrology Panchang Yog 6 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसा, आज 6 मे चा दिवस म्हणजेच आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस भगवान हनुमानाला समर्पित आहे. आज वैशाख शुक्ल पक्षाची नवमी तिथी आहे. आजच्या दिवशी गुरु आणि चंद्र एकमेकांच्या केंद्र भावात असणार आहे. यामुळे गजकेसरी योग (Yog) निर्माण झाला आहे. त्याचबरोबर, आज ध्रुव योग देखील जुळून आला आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या शुभ राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांवर बजरंगबलीची कृपा असणार आहे. तसेच, कामकाजात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या बुद्धीमत्तेचा तुम्ही चांगला लाभ घ्याल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. तुमचं मन प्रसन्न राहील. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुम्ही काही धाडसी निर्णय घ्याल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, कुटुंबात सुख-शांती टिकून राहील. तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. भावा-बहिणीतील नात्यात प्रेम टिकून राहील. मित्रांचा सहवास लाभेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर विशेष आशीर्वाद असणार आहे. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. जोडीदाराबरोबर चांगला संवाद साधाल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, शत्रूंपासून सावध राहा. तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. आज भविष्याची तुम्हाला चिंता भासणार नाही. 

हेही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 6 May 2025 : आज 3 राशींवर खुश होणार बजरंगबली! मेहनतीचं फळ लवकरच मिळणार, आर्थिक स्थितीही सुधारणार, आजचे राशीभविष्य