Astrology Panchang Yog 6 August 2025 : वैदिक शास्त्रानुसार, आज 6 ऑगस्ट 2025 चा दिवस आहे. आजचा दिवस बुधवार असल्यामुळे हा दिवस लाडक्या गणरायाला (Lord Ganesha) समर्पित आहे. तसेच, आज चंद्राने धनु राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आज गजकेसरी नावाचा शुभ संयोग जुळून आला आहे. तसेच, कर्क राशीत बुध आणि सूर्य ग्रहाच्या युतीने बुधादित्य योग जुळून आला आहे. त्यानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना होणार आहे. या राशींच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येतील. तसेच, आर्थिक स्थितीही बदलेल. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमची रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. भौतिक सुख-सुविधांचा तुम्ही लाभ घेऊ शकाल. त्याचबरोबर गणारायाच्या कृपेने आज तुमच्या मनातील एखादी इच्छाही पूर्ण होण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी मिळतील. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस फार अनुकूल असणार आहे. तुमच्या करिअरमध्ये देखील चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काम करता येईल. नोकरदार वर्गातील लोकांची ट्रान्सफर होऊ शकते. तसेच, तुमच्या आजूबाजूला तुम्हाला फार आनंदी वातावरण पाहायला मिळेल. कुटुंबात देखील वाद होणार नाहीत. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस फार मंगलमयी असणार आहे. आज तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. त्याचबरोबर, काही जुन्या समस्या होत्या त्यापासून तुमची सुटका होण्याची शक्यता आहे. तुमच्या पार्टनरबरोबर चांगला संवाद साधाल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचा चांगला ताळमेळ राहील. समाजातील काही दिग्गज लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होण्याची शक्यता आहे. लवकरच प्रवासाला जाण्याचा योग जुळून येणार आहे. धार्मिक कार्यात मग्न व्हाल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस फार चांगला असणार हे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. तसेच, नवीन गोष्टी शिकण्यात तुम्ही मग्न व्हाल. समाजात तुमचा चांगला मान-सन्मान मिळेल. कुटुंबात तुमच्या आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, मित्रांचा तुम्हाला चांगला सहकार्य मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :     

Horoscope Today 6 August 2025 : आजच्या दिवशी 'या' 5 राशींना पावणार गणराया; मार्गातील अडचणींवर कराल मात, इच्छित फळ लवकरच, आजचे राशीभविष्य