Horoscope Today 6 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 6 ऑगस्ट 2025 चा दिवस आहे. आजचा वार बुधवार आहे. त्यानुसार, आजचा दिवस हा गणरायाला समर्पित आहे. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. तसेच, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गणेशाकडे साकडं घातलं जातं. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. मात्र, 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : नवीन संधी मिळतील, बॉसकडून कौतुक होईल.

आर्थिक स्थिती : जुन्या गुंतवणुकीतून फायदा संभवतो.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदारासोबत मतभेद मिटतील.

आरोग्य : डोकेदुखी आणि थकवा जाणवू शकतो.

शुभ उपाय : "ॐ गं गणपतये नमः" ११ वेळा म्हणा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : कामामध्ये स्थिरता राहील, मात्र नवीन प्रोजेक्ट पुढे ढकला.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घ्या.

आरोग्य : अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

शुभ उपाय : पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात, शांत राहा.

आर्थिक स्थिती : अचानक खर्च वाढेल.

प्रेम व नातेसंबंध : गैरसमजामुळे तणाव संभवतो. संवाद आवश्यक आहे.

आरोग्य : थोडा मानसिक तणाव.

शुभ उपाय : गणपतीला दुर्वा अर्पण करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : नोकरी बदलासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घ्या.

आर्थिक स्थिती : पूर्वीची थकीत रक्कम मिळू शकते.

प्रेम व नातेसंबंध : नात्यात नवीन सुरुवात.

आरोग्य : पचनसंस्था त्रासदायक ठरू शकते.

शुभ उपाय : "ॐ नमो भगवते वासुदेवाय" जप करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : नेतृत्वगुण दिसून येतील, टीमला प्रेरणा द्या.

आर्थिक स्थिती : आर्थिक योजना योग्य ठरतील.

प्रेम व नातेसंबंध : आकर्षणाचे वातावरण. एक नवीन व्यक्ति भेटू शकते.

आरोग्य : उष्णतेचा त्रास होऊ शकतो.

शुभ उपाय : सूर्याला पाणी अर्पण करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, परीक्षा यशस्वी ठरेल.

आर्थिक स्थिती : गृहखर्च वाढेल.

प्रेम व नातेसंबंध : लग्नाची चर्चा संभवते.

आरोग्य : थोडासा शारीरिक थकवा.

शुभ उपाय : तुळशीला जल अर्पण करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : नवीन संपर्कातून लाभ होईल.

आर्थिक स्थिती : उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदाराकडून गोड सरप्राइझ मिळेल.

आरोग्य : त्वचेचे विकार उद्भवू शकतात.

शुभ उपाय : तणावपूर्ण वातावरणातही यश मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : तणावपूर्ण वातावरणातही यश मिळेल.

आर्थिक स्थिती : अनावश्यक खर्च टाळा.

प्रेम व नातेसंबंध : जुनं प्रेम परत येण्याची शक्यता.

आरोग्य : झोप कमी होऊ शकते.

शुभ उपाय : "ॐ नमः शिवाय" जप करा.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : आजची मेहनत भविष्यासाठी फळदायी ठरेल.

आर्थिक स्थिती : आर्थिक दृष्ट्या दिवस अनुकूल आहे.

प्रेम व नातेसंबंध : प्रवासात नवीन ओळख.

आरोग्य : पायांमध्ये वेदना जाणवू शकते.

शुभ उपाय : केशर तिळक लावा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : वरिष्ठ तुमच्या कार्यक्षमतेवर खूश असतील.

आर्थिक स्थिती : मालमत्तेसंदर्भातील कामे पूर्ण होतील.

प्रेम व नातेसंबंध : घरच्यांची पसंती मिळेल.

आरोग्य : थकवा आणि पाठीचा त्रास.

शुभ उपाय : शनीला तेल अर्पण करा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : नवीन कल्पना मिळतील, स्वत:ला सिद्ध करण्याची वेळ.

आर्थिक स्थिती : उधारीत पैसे अडकू शकतात.

प्रेम व नातेसंबंध : नात्यात परिपक्वता येईल.

आरोग्य : मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या.

शुभ उपाय : काळा कापड शनिवारी दान करा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : सांघिक कामातून यश मिळेल.

आर्थिक स्थिती : खर्चाचे नियोजन आवश्यक आहे.

प्रेम व नातेसंबंध : जुना मित्र/मैत्रीण पुन्हा संपर्कात येऊ शकतो.

आरोग्य : सर्दी-खोकल्याचा त्रास.

शुभ उपाय : श्रीकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Numerology : लग्नसंस्था, नको गं बाई! लग्नाच्या नावानेच दूर पळतात 'या' जन्मतारखेचे लोक; कितीही मागे लागा, शेवटी आपलंच करतात खरं