Astrology Panchang Yog 5 March 2025 : आज 5 मार्चचा दिवस आहे. आजच्या दिवशी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथी आहे. तसेच, आजचा दिवस गणरायाला समर्पित आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. आज च्या दिवशी गौरी योग (Yog) जुळून आला आहे त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. आज जुळून आलेल्या शुभ योगाचा काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे. या राशींच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, व्यवसायात चांगली प्रगती होईल. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशीच्या लोकांना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज जुळून आलेल्या शुभ योगामुळे तुमचं मनोबल वाढेल. तसेच, आर्थिक बाबतीत तुम्ही सक्षम असाल. नोकरदार वर्गातील लोकांना चांगल्या नोकरीची संधी मिळेल. तर, तरुणांना शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुमचा आजचा दिवस फार खास असणार आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज तुम्ही जो काही विचार कराल त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. त्यामुळे नवीन कार्य हाती घेण्यास तुम्ही सक्षम असाल. तुमच्या व्यवसायातून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल. जेणेकरुन तुम्ही समाधानी असाल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं सतत कौतुक केलं जाईल. तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. त्यामुळे तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते कंपनीच्या हिताचे असणं गरजेचं आहे. मुलांच्या बाबतीत तुम्हाला काहीशी चिंता सतावेल. अशा वेळी त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त संवाद साधण्याचा प्रयत्न करा. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सतर्कतेचा असणार आहे. आज तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी तुमचा व्यवहार देखील चांगला असेल. मात्र, कोणाशीही जास्त जवळीक साधण्याचा किंवा भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करु नका. गणरायाच्या कृपेने तुम्हाला कोणता त्रास होणार नाही. आर्थिक स्थिती चांगली राहील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. तुमच्या सुख-सुविधांत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिएल इस्टेटचा व्यवहार तुमचा चांगला चालेल. आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. तसेच, कुटुंबात आनंदी वातावरण असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 5 March 2025 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य