Astrology Panchang Yog 5 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 5 जुलैचा दिवस आहे. आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस हा शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्राने तूळ राशीत संक्रमण केलं आहे. आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि सिद्धी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. आजच्या शुभ राशींवर शनीदेवाची कृपा असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज या राशीला शनिदेवाचा आशीर्वाद मिळणार आहे. तसेच, आज तुमच्या कामात चांगली प्रगती दिसून येईल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तसेच, जोडीदाराबरोबर चांगला वेळ जाईल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला मित्र-परिवाराचा चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. भौतिक सुख-सुविधांचा तुम्ही लाभ घ्याल. तसेच, तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं कौतुक केलं जाईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त चांगली राहील. आज शनिदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तुमच्या मार्गातील सर्व अडचणी दूर होतील. नोकरदार वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, तुम्ही आजपासून तुमच्या नवीन कामाची सुरुवात करु शकता. तुमचं मन प्रसन्न राहील. तसेच, जर तुम्हाला घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या वाणीत गोडवा पाहायला मिळेल. तसेच, समाजात तुमचा चांगला मान राहील. तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. मुलांच्या कलात्मकतेला चांगला वाव मिळेल. मित्र-मैत्रीणींशी भेटीगाठी होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :