Astrology Panchang Yog 4 August 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज 4 ऑगस्ट 2025 चा दिवस आहे. आजचा वार सोमवार आहे. आज श्रावण महिन्यातील दुसरा दिवस असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढले आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्र ग्रह वृश्चिक राशीत असणार आहे. आज रविवार असल्या कारणाने चंद्राचं अधिपत्य असणार आहे. त्यामुळेच आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र असेल. आज सर्वार्थ सिद्धी योग आणि ऐंद्र योग यांचे संयोजन आहे. यासोबतच, अनुराधा नंतर उद्या ज्येष्ठा नक्षत्राचे संयोजन आहे.  त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. तसेच, आज भगवान भोलेनाथाच्या कृपेने अशा 5 राशी भाग्यशाली असतील, त्यांना चांगला लाभ मिळेल.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

मेष

आजचा सोमवार मेष राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. जुन्या संपर्कांच्या मदतीने तुम्हाला चांगले पर्याय मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इच्छित काम मिळाल्याने आनंद होईल. नोकरीत बदलीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहणार आहे. तुमचे रखडलेले काम गती घेईल. व्यवसायाच्या भल्यासाठी महत्त्वाचे निर्णय घ्याल आणि नवीन बदलांना मान्यता द्याल. कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. जोडीदाराशी समन्वय राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार अपेक्षेपेक्षा चांगला जाणार आहे. आज तुमच्या कामाचे कौतुक होईल. आतापर्यंतच्या तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुम्ही तुमच्या स्पर्धकांवर वर्चस्व गाजवाल. आज तुम्ही कोणत्याही प्रकारच्या लोभ, प्रलोभन किंवा चिथावणीला बळी पडणार नाही. विविध कामात तुम्हाला फायदा होईल. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला चांगले परतावे मिळू शकतात. तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक बळ मिळेल. विद्यार्थी वर्गासाठी दिवस अनुकूल राहणार आहे. जर तुमच्या जोडीदाराशी मतभेद झाले असतील तर आज नाते पुन्हा गोड होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार हा एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुमच्या बोलण्यात, वागण्यात गोडवा आणि सतर्कता दोन्ही फायदेशीर ठरतील. व्यवसायात तुम्हाला कमी अंतराच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. प्रवास तुमच्यासाठी शुभ आणि यशस्वी होणार आहे. या काळात तुम्हाला नवीन संपर्क साधण्याची संधी मिळू शकते. तुम्ही तुमच्या विचारांनी लोकांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. आजचा दिवस अतिरिक्त फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या कुटुंबात मजामस्तीचे वातावरण असेल. विशेषतः तुम्ही लहान भावंडांसोबत चांगला आणि संस्मरणीय वेळ घालवाल. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नातेही दृढ होईल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार शुभ राहणार आहे. आज तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच चमक दिसेल. लोक तुमच्या आकर्षणाने देखील प्रभावित होतील. राजकारण आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी अनुकूल दिवस राहणार आहे. पद आणि प्रतिष्ठेशी संबंधित फायदे मिळू शकतात. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. व्यवसायात चांगला नफा मिळवून देणारा करार अंतिम करण्याची संधी मिळू शकेल. यासोबतच,तुमच्या क्षमता चांगल्या प्रकारे कळतील आणि त्यानुसार तुम्ही निर्णय घ्याल. तुमचा आदर वाढेल. कुटुंबात आनंद आणि शांती राहील. तुम्हाला कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. त्याच वेळी, वैवाहिक जीवनात उत्साह असेल. जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार हा खास असणार आहे. आज तुम्हाला एकापेक्षा जास्त स्रोतांकडून आर्थिक लाभ मिळतील. जर तुमचे पैसे बाजारात अडकले असतील तर आज तुम्हाला ते परत मिळू शकतात, ज्यामुळे तुम्हाला सुटकेचा नि:श्वास राहील. आज तुम्हाला नफा कमावण्याच्या संधी मिळतील. जवळच्या व्यक्तीच्या मदतीने मोठा व्यवहार पूर्ण करण्याची संधी मिळू शकते.  नोकरी करणाऱ्यांना मित्रांच्या मदतीने फ्रीलान्सिंगसारखे काम मिळू शकते, जिथून तुम्ही अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकाल. आज तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल. तुम्हाला मित्रांकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंद आणि समृद्धी येईल. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा येईल.

हेही वाचा :           

Shravan Somvar 2025: आजचा दुसरा श्रावणी सोमवार अद्भूत! तब्बल 3 दुर्मिळ शुभ योग बनतायत, 'या' 3 राशींचे टेन्शन संपलेच म्हणून समजा..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)