Horoscope Today 4 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 4 ऑगस्ट 2025, आजचा वार सोमवार आहे. आज श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार आहे आहे, हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकरांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज कलाकारांच्या कलेला उत्तेजन मिळेल, कमी कष्टात आर्थिक लाभ होतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज थोडी खर्च कृती राहिल्यामुळे हातात पैसा राहणार नाही, काही महत्त्वाचे निर्णय विचार करून घेतले जाण्याची शक्यता
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज तुमच्या हट्टी आणि लहरी स्वभावाचा जवळच्या लोकांना त्रास होईल, थोड्या कारणाने आजारी पडण्याची शक्यता
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो महिला कोणाच्या तंत्राने चालणार नाहीत. घाईने निर्णय घेतलेत तर प्रगती खुंटण्याची शक्यता
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज परदेश जाण्याची इच्छा असणाऱ्यांना संधी येतील, उच्च शिक्षणाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज अध्यात्मिक जीवनाची आवड असणारे ध्यान उपासनेत राहून जातील, घरामध्ये धार्मिक आणि मंगल कार्य घडतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज सामाजिक काम करणाऱ्यांना भरपूर सहकार्य मिळाल्यामुळे, हातून चांगले कार्य होईल. महिला प्रभुत्व गाजवतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज चांगली बुद्धिमत्ता असूनही तिचा योग्य वापर न केल्यामुळे कामे रखडतील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज पैसा आला तरी खर्चाला मर्यादा राहणार नाही, छोटे-मोठे प्रवासाचे योग येतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो कुटुंब आणि मित्रांसमवेत सहलीला जाण्याचे बेत ठरवाल, अचानक एखादे जुने येणे वसूल होण्याची शक्यता
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही प्रगतीपत चालू राहणार आहे, एखाद्या दुर्मिळ संधीबद्दल उगीचच अलिप्तपणा दाखवाल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज जास्त ताण वाढवून घेण्याचे कारण नाही, त्यामुळे एखाद्या गोष्टीचा दिलखुलासपणे आस्वाद घ्या
हेही वाचा :
Weekly Lucky Zodiac Signs 4 to 10 August 2025: पुढचे 7 दिवस अद्भूत! पॉवरफुल बुधादित्य योग बनतोय, 'या' 5 राशींच्या संपत्तीत भरभराट होणार, सुखाचा आठवडा..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
