Astrology Panchang Yog 3 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 3 जुलैचा दिवस आहे. आजचा वार गुरुवार हा दत्तगुरुंना (Dattaguru) समर्पित आहे. आजच्या दिवशी चंद्राने तूळ राशीत प्रवेश केला आहे. तसेच, आजच्या दिवशी रवि योग (Yog) आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास आहे. आजच्या शुभ राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या शुभ दिवसाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आबे. आज तुमच्या कारभारात चांगला विस्तार झालेला दिसेल. तसेच, तसेच, आजच्या दिवशी तुमची रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. तसेच, नवीन कार्याची सुरुवात तुम्ही आजपासून सुरु करु शकता. तुमची बिघडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. तसेच, आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, तुमच्या बुद्धीमत्तेचा चांगला विकास झालेला दिसेल. आज तुम्हाला वाहनसुख मिळेल. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवाल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस फार अनुकूल असणार आहे. बिझनेस करणाऱ्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स मिळतील. तुमचा आत्मविश्वास पुन्हा वाढलेला दिसेल. तसेच, सामाजिक क्षेत्रात तुमचा विकास वाढलेला दिसेल. तुमच्या आरोग्यात पूर्वीपेक्षा जास्त सुधारणा झालेली दिसेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. तसेच, तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल. आज सगळी कामे तुमच्या मनाप्रमाणे घडतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, भौतिक सुख-समृद्धीचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस फार भाग्यशाली असणार आहे. आज तुमच्या कामात आलेल्या साऱ्या अडचणी दूर होतील. तसेच, नोकदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाप्रती तुम्ही प्रामाणिक असाल. तसेच, तुमच्या कुटुंबातील वातावरण फार अनुकूल असेल. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :    

Horoscope Today 3 July 2025 : आज गुरुवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरु दाखवणार मार्ग; संकटं कोसो होतील दूर, आजचे राशीभविष्य