Astrology Panchang Yog 28 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस रविवार आहे. आज वैशाख महिन्यातील अमावस्या तिथी आहे. तसेच. आजच्या दिवसाचा अधिपती ग्रह सूर्य आहे. आज चंद्राने मेष राशीत प्रवेश केला आहे. तसेच, अश्विनी नक्षत्र आणि प्रीति योगाचा (Yog) देखील शुभ संयोग जुळून आला आहे. या योगांच्या शुभ संयोगामुळे आज सर्वार्थ सिद्धी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. आजच्या शुभ दिवसाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. य़ा लकी राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमचं साहस दिसून येईल. तसेच, आज तुमच्या शत्रूंपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, अनेक सुख-सुविधांचा तुम्ही लाभ घेण्यासाठी सक्षम असाल. तुमच्या कुटुंबात शांती टिकून राहील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार अनुकूल असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. आज तुमचं मन प्रसन्न असेल. मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी कामे पूर्ण होऊ शकतील. समाजात तुमची मान-प्रतिष्ठा वाढलेली दिसेल. प्रगतीचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभकारक असणार आहे. वडिलोत्पार्जित संपत्तीचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. तसेच, तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. जर तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस फार चांगला असणार आहे. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क असण्याची गरज आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुम्ही केलेल्या मदतीचं चांगलं पुण्य फळ मिळेल. तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या असतील त्या लवकरच दूर होण्यासाठी मदत होईल. आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. मुलांसाठी आजचा दिवस सुट्टीचा असल्या कारणाने मुलं आनंदात असतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. मित्रांच्या सहकार्याने तुम्ही तुमची कामे पूर्ण करु शकाल. तसेच, प्रगतीचे अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळण्यास मदत होईल. तसेच, आयटी क्षेत्रातील लोकांना आज चांगला लाभ मिळणार आहे. जोडीदाराच्या साथीने तुमच्या सर्व समस्यांवर मार्ग निघेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :