Astrology Panchang Yog 26 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 26 जुलै 2025 चा दिवस आहे. आजचा दिवस हा शनि महाराजांना (Shani Dev) समर्पित आहे. तसेच, आज चंद्राने सिंह राशीत संक्रमण केलं आहे. आज शनि आणि मंगळ ग्रहाची युती देखील होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. तसेच, आजच्या दिवशी लक्ष्मी योगासह धन योग देखील जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तसेच, ट्रान्सपोर्ट क्षेत्राशी संबंधित तुमची कामेही पटापट होतील. काही लोक आजपासून व्यवसायाची सुरुवात देखील सुरु शकता. वाहन सुखाचा तुम्हाला आनंद घेता येईल. तसेच, आज कुटुंबात आनंदी वातावरण असणार आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस फार उमेदीचा असणार आहे. आज तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळे. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीतही चांगली सुधारणा झालेली दिसेल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, राजकीय क्षेत्रात तुम्ही सक्रिय व्हाल. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. करिअरच्या नवनवीन संधी तुमच्यासमोर उपलब्ध होतील. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळू शकतं. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस फार शुभकारक असणार आहे. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला काम करता येईल. तसेच, तुमच्यावर कोणाचा दबाव नसणार आहे. तुम्हाला मानसिक शांतीदेखील मिळेल. तसेच, धार्मिक यात्रेसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. नवीन गोष्टींचा लाभ घ्याल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. शनिदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर जावं लागू शकतं. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील कामे लवकर संपतील. तसेच, कुटुंबात आनंदी वातावरण राहील. नवीन गोष्टी शिकण्यास तुम्ही उत्सुक असाल. मुलांकडून शुभवार्ता ऐकायला मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Horoscope Today 26 July 2025 : आजचा शनिवार 5 राशींसाठी ठरणार भाग्यवान; शनि महाराज संकटातून दाखवणार मार्ग, मिळतील 'हे' संकेत, आजचे राशीभविष्य