Astrology Panchang Yog 22 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 22 जूनचा दिवस म्हणजेच आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. तसेच, आज चंद्राने मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश केला आहे. तसेच, आजच्या दिवशी बुधादित्य योग (Yog), भरणी नक्षत्रासह अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. तसेच, आज सुकर्मा योगासह त्रिपुष्कर योगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. तसेच, तुम्हाला तुमच्या कामात चांगलं यश मिळेल. तुम्ही नियोजित केलेली कामे वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तुमचं व्यक्तिमत्व उठून दिसेल. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस उमेदीचा असणार आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, भाग्याची तुम्हाला चांगली साथ मिळेल. आज तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामावर तुमचे बॉस खुश होतील. तसेच, आज सुट्टीचा दिवस तुमच्यासाठी फार चांगला जाणार आहे. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज सूर्यदेवाच्या कृपेने तुमचं भाग्य उजळणार आहे. तसेच, तुमची सर्व कामे आज लवकर पूर्ण होतील. जर तुम्हाला प्रवासकरायचा असेल तर आजचा दिवस चांगला असेल. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असेल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा देखील तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. प्रवास करण्यासाठी ही वेळ अनुकूल असणार आहे. तसेच, संध्याकाळी तुमच्या जवळपास असलेल्या मंदिराला भेट द्या. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच, आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. नवीन जोखीम तुम्ही हाती घेऊ शकता. तसेच, लवकरच प्रवासाला जाण्याचे योग जुळून येणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अतिरिक्त लाभ मिळेल. मित्रांचा चांगला पाठिंबा तुम्हाला मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :     

Horoscope Today 22 June 2025 : आज रविवारच्या दिवशी 'या' 3 राशींना मिळणार लाभ; मार्गातील सर्व अडथळे होतील दूर, आजचे राशीभविष्य