Horoscope Today 22 June 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 22 जून 2025, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीखंडोबाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज थोडे जास्त परंपरा वादी बनाल, एखाद्या गोष्टीची काळजी जास्त कराल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज उत्साह आत्मविश्वास वाढवण्याची आवश्यकता आहे, आपल्या मेहनती कष्टाळू स्वभावामुळे सर्व कामे पार पाडाल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज महिला खूप विचार करतील, बरेच दिवसांपासून एखादे काम डोक्यात असेल त्या कामाची सुरुवात करायला आजचा दिवस चांगला आहे
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो एखादे काम पूर्ण होण्यासाठी मध्यस्थ करून ठेवा, म्हणजे काम चटपट होऊन जाईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज टेलिफोन कॉम्प्युटर ट्रॅव्हल एजन्सी या संदर्भातील कामांना वेग येईल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज गरोदर स्त्रियांनी आज योग्य ती काळजी घ्यावी. संततीच्या संदर्भातील चांगल्या बातम्या कानावर येतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज मैदानी खेळ खेळणाऱ्यांना आपली कला चांगल्यापैकी इतरांसमोर दाखवता येईल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज वेगवेगळ्या संधी मिळतील परदेश गमनासंबंधीतील कामांमध्ये अडचणी येऊ शकतात
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज शेजाऱ्यांशी मतभेद संभवतात, महिला घरातील मंगल कार्यात गर्क होतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज संततीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल नोकरी व्यवसायात सर्व गुप्त गोष्टी इतरांसमोर बोलल्या पाहिजेत असे नाही
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज नवीन कामाची सुरुवात करताना त्याबाबतीत तपशीलवार माहिती घ्यावी लागेल, त्यानंतर कामाची सुरुवात आखणी करा
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज वडिलोपार्जित जमिनी संबंधीचे तंटे सोडवण्यात शक्ती आणि पैसा खर्च पडेल, परंतु नंतर त्यामध्ये यश मिळू शकते
हेही वाचा :
