Astrology : आज धन योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कर्कसह 'या' 5 राशींवर सूर्यदेवाचा असणार वरदहस्त, घरात लक्ष्मी नांदणार

Astrology Panchang Yog 18 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या शुभ योगामुळे 5 राशींना विशेष लाभ होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

Astrology Panchang Yog 18 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 18 मे चा दिवस आहे. म्हणजेच आजचा वार रविवार. आज ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी उपरांत षष्ठी तिथीचा संयोग आहे. त्याचबरोबर, सर्वार्थ सिद्धी योगदेखील आहे. आज सूर्यदेवाची काही शुभ राशींवर विशेष कृपा असणार आहे. शिवाय समसप्तक योगाबरोबर धन योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. या शुभ राशींच्या संपत्तीत भरभरून वाढ होणार आहे. 

Continues below advertisement

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या शुभ योगामुळे 5 राशींना विशेष लाभ होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस फार शुभ जाणार आहे. आज तुमच्यावर सूर्यदेवाची विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, तुम्ही जिथे पैशांची गुंतवणूक कराल तिथून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. सामाजिक स्थिती तुमची चांगली राहील. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणाने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. शिवाय जोडीदाराचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, सगळ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होईल. आध्यात्मिक गोष्टीत तुमचं मन रमेल. मुलांसाठी सुट्टीचा काळ चांगला जाईल. त्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. जोडीदाराकडून शाबासकी देखील मिळेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज सूर्यदेवाची तुमच्यावर कृपा आहे. त्यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे आज दूर होतील. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभकारक असणार आहे. आज तुम्हाला अप्रात्यक्षिक धनलाभ होईल. तसेच, मित्रांच्या सहकार्याने तुम्ही अनेक कामे सहज पूर्ण करु शकता. तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण होईल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार भाग्याचा असणार आहे. आज जुळून आलेल्या धन योगाचा लाभ या राशीच्या लोकांना होणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होतील. मेहनत करण्याची तुमची तयारी दिसेल. तसेच, समाजात देखील तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी मे महिन्याचा नवीन आठवडा कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola