Astrology Panchang Yog 17 April 2025 : आज  17 एप्रिल म्हणजेच गुरुवारचा दिवस आहे. म्हणजेच दत्तगुरुंचा वार असल्या कारणाने अनेक राशींसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज चतुर्थी तिथीचा संयोग (Yog) जुळून आला आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्र वृश्चिक राशीत आहे. त्यामुळे समसप्तक योग जुळून आला आहे. त्याचबरोबर मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनाने परिवर्तन योगसुद्धा जुळून आाला आहे. त्यामुळे ज्येष्ठा नक्षत्राच्या प्रभावाखाली मीन राशीत चार ग्रह जसे की, शुक्र, बुध, शनी आणि राहू असल्यामुळे चतुर्ग्रही योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. या योगामुळे अनेक राशींच्या लोकांना याचा चांगलाच लाभ मिळणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशींच्या लोकांवर दत्तगुरुंचा आशीर्वाद असणार आहे. तुमच्या कामकाजात तुम्हाला चांगले मार्ग सापडतील. वाईट गोष्टींच्या आहारी जाण्याआधी तुम्हाला काही संकेत मिळतील. त्यामुळे तुमचा त्यापासून बचाव होऊ शकतो. तसेच, आज एखाद्या गरजू व्यक्तीची तुमच्याकडून मदत केली जाईल. त्यामुळे एक समाधानाची भावना तुमच्यामध्ये निर्माण होईल. धन-धान्य, संपत्तीने तुम्ही परिपूर्ण असाल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला छान आनंद होईल. तसेच, तुमचं जर एखादं काम अनेक दिवसांपासून थांबलं असेल तर त्याला आज चांगली गती मिळेल. कुटुंबियांच्या मदतीने तुमची स्वप्न तुम्ही साकारु शकाल. अभ्यासात मुलांचं मन रमेल. तसेच, नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता देखील असेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तसेच, घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मदतीने तुम्हाला नवीन गोष्टी शिकता येतील. जर तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. मात्र, कोणताही निर्णय एकट्याने घेऊ नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घ्या. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण दिसून येईल. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानाचा असणार आहे. तसेच, तुमचे धार्मिक कार्यात मन गुंतेल. संध्याकाळच्या वेळी घराच्या शेजारी असलेल्या मंदिरात जाऊन देवाच्या मंत्राचा जप करा. तसेच आशीर्वाद घ्या. तुम्हाला इच्छित फळ लवकरच मिळेल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. मित्रांच्या सहकार्याने तुमची इतरही सगळी कामे सहज शक्य होतील. जोडीदाराचा चांगला पाठिंबा मिळेल.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभकारक असणार आहे. दत्तगुरुंची तुमच्यावर चांगली कृपा असणार आहे. त्यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे आज दूर होतील. आज नवीन ठिकाणाला तुम्ही भेट द्याल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत देखील तुम्हाला कोणतीच चिंता करण्याची गरज भासणार नाही. मात्र, नियमित योग करा आणि सकस आहार घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Horoscope Today 17 April 2025 : आजचा गुरुवार खास! दत्तगुरुंचा 5 राशींना मिळणार संकेत; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य