Astrology Panchang Yog 14 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 14 ऑगस्ट म्हणजेच आजचा वार गुरुवार आहे. आजचा दिवस हा दत्तगुरुंना समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्राने मेष राशीत प्रवेश केला. आज वसुमान योगासह अश्विनी नक्षत्राच्या संयोगात रवि आणि सर्वार्थ सिद्धी योग निर्माण झाला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. तसेच, आजच्या दिवशी शुभ राशींना करिअरमध्ये देखील चांगली संधी निर्माण होण्याची स्थिती आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या शुभ राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस मंगलमय असणार आहे. तसेच, आयात निर्यातीच्या क्षेत्रात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला घराबाहेर पडावं लागू शकतं. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमचा चांगला विकास झालेला दिसेल. भौतिक सुख सुविधांचा तुम्ही चांगला लाभ घ्याल. तसेच, नोकरीत चांगले परिणाम मिळतील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाटी आजचा दिवस फार खास असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, समाजात तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावशाली दिसेल. मेडिकल क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. मित्रांशी चांगले संबंध निर्माण होतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. जोडीदाराबरोबर तुम्ही नवीन कार्याची सुरुवात देखील करु शकता.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस फार कास असणार आहे. तुम्ही नवीन योजनांचा चांगला लाभ घ्याल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त चांगली असेल. तुम्ही जिथे गुंतवणूक कराल तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तर, जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे काम तुम्ही पूर्ण करु शकता. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे तुम्ही सहजपणे पूर्ण करु शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :