Janmashatami 2025: भक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. तो दिवस म्हणजे कृष्णजन्माष्टमी एक दिवसावर येऊन ठेपलाय. या निमित्त सर्वत्र जय्यत तयारीही सुरूय. धार्मिक दृष्टिकोनातून तसेच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून जन्माष्टमी सण खूप महत्त्वाचा आहे. यंदा 16 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा केला जाईल. हा दिवस अत्यंत खास असणार आहे, कारण या दिवशी 4 ग्रह एका स्थितीत असतील, ज्यामुळे 12 पैकी 3 राशींचे टेन्शन आता कायमचे मिटणार आहे. कारण भगवान कृष्णांची कृपा या राशींच्या लोकांवर असणार आहे. जाणून घ्या..
5 ग्रह एकत्रितपणे धनवर्षाव करतील..
ज्योतिषशास्त्रानुसार, 16 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीला बुध, गुरू, सूर्य आणि शनि एक दुर्मिळ संयोग करत आहेत. जन्माष्टमीला बुध सूर्यासोबत संयोग करेल. शनि वक्री आहे, गुरु आणि शुक्र मीन राशीत एकत्र येऊन एक अतिशय शुभ योग तयार करतील. याशिवाय, भरणी, कृतिका आणि रोहिणी नक्षत्रांचे संयोग देखील असतील. तसेच, 16 ऑगस्ट 2025 रोजी वृद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि ज्वालामुखी योग यांचे उत्तम संयोजन तयार होत आहे. जाणून घ्या या महान संयोजनामुळे कोणत्या 3 राशींना भरपूर फायदा होईल.
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी जन्माष्टमीला तयार होणारे शुभ योग खूप फलदायी ठरतील. तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. तुम्हाला मोठे यश मिळू शकते. लग्न निश्चित होण्याची शक्यता देखील आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो.
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु आणि शुक्र यांच्या युतीमुळे मिथुन राशीच्या लोकांना भरपूर फायदा होईल. तुम्हाला करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. तुमची एखाद्याशी चांगली भागीदारी होऊ शकते. व्यवसायातील लोक भरपूर पैसे कमवतील.
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार, जन्माष्टमीच्या शुभ योगांमुळे सिंह राशीच्या लोकांसाठी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. या वेळी केलेले काम शुभ परिणाम देईल. ऑफिसमध्ये तुमची स्थिती चांगली राहील. व्यवसायात नफा होईल. प्रेम जीवन चांगले राहील. मूल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
Horoscope Today 14 August 2025: आजचा गुरूवारचा दिवस 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरूंच्या कृपेने संकट टळेल, आजचे राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)