Astrology Panchang Yog 11 June 2025 : वैदिक पंचांग शास्त्रानुसार, आज 11 जूनचा दिवस आहे. म्हणजेच आजचा वार बुधवार. आजचा दिवस हा गणरायाला समर्पित आहे. तसेच, चंद्राने वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर, आज ज्येष्ठी योगासह भद्र राजयोगाचा उत्तम संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे.  

वैदिक पंचांगानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज गणपतीच्या कृपेने तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, ऑफिसमध्ये सहकाऱ्यांकडून तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. तुमची आर्थिक बाजू चांगली असेल. कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, तुम्ही ठरवलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येऊ शकतात. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तुमची तयारी असेल. तसेच, कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांचा सपोर्ट देखील तुम्हाला मिळेल. आज धार्मिक कार्यात तुम्ही मग्न व्हाल. त्यामुळे तुमचा मानसिक ताण दूर होईल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज संध्याकाळी तुमच्या घरी पाहुण्यांचं आगमन होण्याची शक्यता आहे. या निमित्ताने तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होईल. तसेच, तुमची रखडलेली कामे पुन्हा मार्गी लागतील. नवीन वस्तूंची खरेदी कराल. मात्र, विनाकारण पैसा खर्च करु नका. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार आणखी वाढेल. नवीन कल्पना तुमच्या स्मृतीत येतील. तसेच, महिनांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. तुमच्यातील कलागुण आज इतरांना दिसतील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमच्या उत्पन्नात वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमचं मन शांत असेल. कुटुंबात लवकरच शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत राहील. आज तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :  

Horoscope Today 11 June 2025 : आज गणरायाच्या कृपेने 'या' 4 राशींची संकटातून होणार सुटका; चांगले कार्य लागेल मार्गी, आजचे राशीभविष्य