Astrology Panchang Yog 10 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज गुरुवारचा दिवस म्हणजेच आजचा दिवस दत्तगुरुंचा आहे. आज गुरु ग्रहाने मृगशिरा नक्षत्रात प्रवेश केला आहे. तसेच, गुरु आणि चंद्र ग्रह यांच्यात आज नवपंचम योग (Yog) जुळून आला आहे. तसेच, बुध आणि शुक्राचीही युती जुळून आल्यामुळे लक्ष्मी नारायण योगाचा शुभ संयोगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या शुभ राशींच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. या राशींना कोणकोणत्या बाबतीत भाग्याची साथ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारच लाभदायक असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये चांगलं यश मिळेल. तसेच, जे लोक अकाऊंट आणि सेल्स मार्केटिंगशी संबंधित आहेत त्यांना आज एखादी मोठी डील मिळू शकते. तुमच्या नोकरीत अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समस्या हळुहळू दूर होतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांवर आज देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असणार आहे. आज तुम्हाला अनपेक्षितपणे धनलाभ होईल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. व्यवसायातून तुमची चांगली कमाई होईल. विविध क्षेत्रांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशांतून तुम्हाला भविष्यासाठी चांगला पैसा साठवता येईल. मुलांच्या संदर्भात एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला भाग्याची साथ मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि कलात्मकतेला चांगला वाव मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्ही परिपूर्ण असाल. तसेच, जर तुम्हाला नोकरीत काही बदल करायची असतील तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही टीमवर्कमध्ये काम कराल. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. बचत योजनेचा लाभ घ्याल. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, तुम्हाला तुमच्या वाईट काळात मित्रांची चांगली साथ लाभणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, तुमचं अनेक दिवसांपासून रखडलेले काम तुम्हाला आज पूर्ण करता येणार आहे. सामंजस्याने तुम्ही व्यवहार कराल. मात्र, विनाकारण पैशांमध्ये गुंतवणूक करु नका. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: