Astrology Panchang Yog 1 July 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज 1 जुलैचा दिवस आहे. आजचा वार मंगळवार आहे. हा दिवस श्री गणेश (Lord Ganesh) तसेच भगवान हनुमान यांना (Lord Hanuman) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्राचे संक्रमण कन्या राशीत असेल.  तसेच, आज चंद्र आणि गुरू एकमेकांपासून चौथ्या आणि दहाव्या घरात राहून गजकेसरी योगाचे सुंदर संयोजन करत आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. आज श्रीगणेश तसेच हनुमानजींच्या आशीर्वादाने आणि गजकेसरी योगाच्या शुभ संयोगाने, 5 राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. आज तुम्हाला करिअरपासून व्यवसायापर्यंत नशिबाची साथ मिळेल. तुमचे प्रलंबित काम पूर्ण होईल आणि कुटुंबातही समृद्धी आणि आनंद राहील

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष

ज्योतिषशास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ मेष राशीला होणार आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ हा आहे. मंगळवारी या राशीच्या लोकांनी त्यांचे धैर्य, ऊर्जा आणि निर्णय घेण्याची शक्ती बळकट करण्यासाठी काम करावे. या दिवशी तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करू शकता किंवा व्यवसायिक करार शक्य आहे. वैवाहिक जीवनात गोडवा येईल. भाग्यशाली रंग- लाल भाग्यशाली अंक- 9, उपाय- हनुमान चालीसा पठण करा.

सिंह

ज्योतिषशास्त्रानुसार, जुलैचा पहिला दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी उत्तम राहील. या दिवशी चंद्र सिंह राशीत असेल. सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. जुलैच्या पहिल्या दिवशी सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये उत्तम संधी मिळू शकतात आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या जोडीदाराशी असलेली जवळीक प्रेमसंबंधात वाढू शकते. भाग्यशाली रंग- सोनेरी भाग्यशाली अंक- 1, उपाय- हनुमानजींना सिंदूर अर्पण करा.

कन्या

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी जुलैचा पहिला दिवस शुभ राहील. या दिवशी पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा शुभ प्रभाव दिसून येईल. व्यावसायिक जीवनात वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद होऊ शकतो. प्रेमात दिलेला प्रस्ताव यशस्वी होईल. भाग्यशाली रंग- हिरवा, भाग्यशाली अंक- 5, उपाय- गूळ आणि हरभरा वाटा.

वृश्चिक

ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा दिवस खास असेल. वृश्चिक राशीची रास देखील मंगळाची रास आहे. मंगळाची रास असल्याने हा दिवस खास असेल. तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो, हा दिवस गुंतवणुकीसाठी योग्य आणि सर्वोत्तम आहे. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये दिलासा मिळण्याची चिन्हे असू शकतात. भाग्यशाली रंग- तांबडा,  भाग्यशाली अंक- 8 उपाय- मसूर दान करा.

धनु 

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी हा दिवस शिक्षण, प्रवास, परदेशाशी संबंधित कामात यश मिळवून देऊ शकतो. या दिवशी अध्यात्म आणि सकारात्मक विचार तुमच्या जीवनात बदल आणू शकतात. भाग्यशाली रंग- पिवळा भाग्यशाली अंक- 3,  उपाय- गरिबांना अन्न द्या.

हेही वाचा :                          

July 2025 Astrology: अखेर जुलै महिन्याची दणदणीत सुरूवात! तब्बल 6 ग्रहांचे संक्रमण होणार, 'या' 5 राशींनी टेन्शन सोडा, शुभ काळ आलाच

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)