Astrology Panchang Yog 03 April 2025 : आज 3 एप्रिल म्हणजेच आजचा वार गुरुवार. आजचा वार दत्तगुरुंना समर्पित आहे. तसेच,आजच्या दिवशी चैत्र शुक्ल षष्ठी तिथीचा संयोग (Yog) जुळून आला आहे. त्याचबरोबर गजकेसरी योगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस खास असणार आहे. आज रोहिणी उपरात मृगशिरा नक्षत्राचा योग आहे. सर्वात खास म्हणजे आज सौभाग्यासह रवियोगाचा देखील शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस अनेक अर्थांनी खास असणार आहे. आजच्या भाग्यवान राशींना (Zodiac Signs) अनेक चांगले लाभ मिळणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच, कठीण काम सोप्या पद्धतीने पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या व्यवसायात तुम्ही चतुराईने व्यवहार कराल. यात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला धनलाभ होईल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणारआहे. तसेच, कुटुंबात देखील आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुमच्या बिझनेसमध्ये आज तुम्हाला एखादी चांगली डीलदेखील मिळू शकते.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला जे काही पुण्य मिळेल त्यात तुम्ही खुश राहाल. त्यामुळे तुमची समाधानी वृत्ती दिसून येईल. तसेच, आज कामाच्या निमित्ताने तुम्हाला भरपूर प्रवास करावा लागू शकतो. त्यामुळे आरोग्याची देखील तितकीच काळजी घ्या. बदलत्या वातावरणाचा तुम्हाला त्रास होऊ शकतो.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक दृष्टीने भाग्यशाली असणार आहे. आज तुमच्यासाठी उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तसेच, जर तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ शुभ असणार आहे. तुमच्या कुटुंबात आज आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुमच्या कामाचं कुटुंबियांकडून कौतुक केलं जाईल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर ही तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. तरुणांसाठी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. इतकंच नव्हे तर आज तुमची अनोळखी व्यक्तीशी भेट होईल. मात्र, ही साधीसुधी बेट नसेल. याचा भविष्यात तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: