Astrology Panchang 08 October : आज मंगळवार, 8 ऑक्टोबर रोजी चंद्र वृश्चिक राशीनंतर धनु राशीत जाणार आहे. तसेच, आज आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असून या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सौभाग्य योग, रवियोग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मिथुन रास (Gemini)


आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना बाप्पाच्या कृपेने आज एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे कमवण्यात यश मिळेल. तुमचा बँक बॅलन्स आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रदीर्घ प्रलंबित काम पूर्ण केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल आणि एकाग्रता राखली जाईल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर, तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही समजूतदारपणाने वागाल.


कन्या रास (Virgo)


आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या नशिबाने तुमच्या आजूबाजूचं वातावरण आज चांगलं राहील. आज तुमचं आरोग्यही चांगलं राहील. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आज चांगला नफा मिळेल आणि तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंधही चांगले राहतील. वैवाहिक जीवनात काही कलह चालू असतील तर ते आज संपुष्टात येतील. कुटुंबासोबत संध्याकाळ घालवाल आणि मित्रांच्या भेटीही होतील.


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आज त्यांच्या मुलांकडून किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार लोक पुढच्या दिवसाचे नियोजनही करतील. आज तुम्ही तुमच्या चैनीच्या वस्तूंवर थोडे पैसे खर्च करू शकता आणि कुटुंबातील सदस्यासाठी नवीन तंत्रज्ञान किंवा मोबाईल लॅपटॉप किंवा इतर गॅझेट खरेदी करू शकता.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. बाप्पाच्या कृपेने तुम्ही तुमच्या जीवनातील तणावापासून मुक्त राहाल. आज व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल आणि भरपूर पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत असलेल्यांना आज त्यांच्या अधिका-यांचे सहकार्य लाभेल, त्यामुळे त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासातूनही दिलासा मिळेल. तुमच्या मुलांचे भविष्य लक्षात घेऊन तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करू शकता. आज नशिबाची साथ मिळाल्यास अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळतील. आज तुम्ही कुटुंबाच्या सर्व गरजा सहज पूर्ण करू शकाल. 


मीन रास (Pisces)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज मीन राशीचे लोक मोठ्या समस्यांना सामोरे जाण्यास सक्षम असतील. आज तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रात प्रगतीच्या चांगल्या संधी असतील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला फायदा होईल. आज जर नशीब तुमच्या बाजूने असेल तर तुमच्या सर्व चिंता दूर होतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि प्रत्येक टप्प्यावर संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 08 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य