Astrology 24 April 2024 : आज, बुधवार, 24 एप्रिल रोजी चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी असून या दिवशी सिद्धी योग, व्यतिपात योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात आज खूप सुधारणा होईल आणि तुमचं काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल. नोकरीत बॉस आज तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतात, जे तुमच्यासाठी मोठ्या यशाचं लक्षण असू शकतं. आज लोकांशी तुमचा संवाद वाढेल आणि नवीन मित्रांशी मैत्रीची एक सुंदर सुरुवात होऊ शकते. आरोग्य चांगलं राहील आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहील. आज तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि तुमचा बँक बॅलन्स देखील वाढू शकतो. कौटुंबिक जीवन चांगलं राहील.


कन्या रास (Virgo)


आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी ठरेल. कन्या राशीच्या लोकांना आज प्रत्येक काम पूर्ण उत्साहाने करायला आवडेल आणि नवीन कामातही तुम्हाला यश मिळेल. तुमच्या सभोवतालच्या वातावरणामुळे तुमचं मन खूप आनंदी असेल, ज्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. आज तुमची आर्थिक स्थिती अतिशय चांगली राहील. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे ते त्यांचं करिअर नीट सुरू करू शकतील. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचं झाल्यास, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आज तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचारही कराल.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. तूळ राशीच्या लोकांना आज आपलं काम मोठ्या उत्साहाने करावं लागेल, तरच तुम्हाला कामात मोठं यश मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम फुलेल आणि तुमच्यातील समंजसपणा वाढेल. नोकरदार लोकांना आज एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, तुमच्या मेहनतीला यश येईल. प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध दृढ होतील आणि त्यांच्या मदतीने अनेक कामं पूर्ण होतील. मुलांचा विकास पाहून मन प्रसन्न होईल आणि घरात सुख-शांती आणि समृद्धी नांदेल. तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला आनंद मिळेल.


धनु रास (Sagittarius)


आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी खूप भाग्याचा असेल. आज श्रीगणेशाच्या कृपेने धनु राशीच्या लोकांची अपूर्ण कामं कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतील आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. नोकरदार लोकांच्या कामावर बॉस प्रभावित होईल, ज्यामुळे चांगली पगारवाढ होऊ शकते. तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही चिंता राहणार नाही आणि तुम्ही तुमच्या कामात पूर्ण ताकदीनिशी पुढे जाऊ शकाल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक असून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे भावा-बहिणींसोबतचे संबंध चांगले राहतील आणि कौटुंबिक जीवन चांगलं राहील.


कुंभ रास (Aquarius)


आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक नवीन संधी मिळतील. आजचा दिवस गुंतवणुकीच्या दृष्टीने अनुकूल असेल, ज्याचा तुम्हाला भविष्यात आर्थिक फायदा होईल. जे आधीच विवाहित आहेत ते त्यांच्या मुलांसोबत आनंदी वेळ घालवतील. जे अविवाहित आहेत, त्यांच्या लग्नाची चर्चा पुढे येऊ शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना आर्थिक यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांचे सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील, त्यामुळे तुमचं काम वेळेवर पूर्ण होईल. कुटुंबात विशेष पाहुण्याच्या आगमनामुळे घरात उत्साहाचं वातावरण असेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Rajyog : तब्बल 50 वर्षांनंतर बनले 'लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य राजयोग'; 'या' 3 राशींना मिळणार अपार पैसा, पद आणि प्रतिष्ठा