Hanuman Jayanti 2024 : आज, मंगळवार, 23 एप्रिल रोजी चंद्र तूळ राशीत जाणार आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा असून या तारखेला हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2024) उत्सव साजरा केला जातो. धार्मिक शास्त्रानुसार, या दिवशी पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला. हनुमान जयंतीच्या दिवशी सिद्धी योग, त्रिग्रही योग आणि चित्रा नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होईल आणि तुम्हाला कुटुंबासोबत संस्मरणीय वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम बहरेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. दुसरीकडे, नोकरदार लोकांना आज पूर्ण उत्साहाने काम करायला आवडेल आणि तुमच्या कामाचं अधिकारी कौतुकही करतील. आज व्यावसायिक एखादी मोठी डील फायनल करू शकतात, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या आवडीच्या छंदात थोडा वेळ घालवल्याने तुमचं मन शांत आणि आनंदी राहील. कौटुंबिक जीवन चांगलं राहील आणि भावा-बहिणींकडून पूर्ण सहकार्य मिळेल.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. कर्क राशीच्या लोकांचा ऑफिसमध्ये दिवस चांगला जाईल. आज तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल तर आज अर्ज करणं तुमच्यासाठी शुभ राहील. नोकरदार लोकांना आज एखाद्या मित्राकडून नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल आणि नवीन गुंतवणूक देखील फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आज मंदिरात जाऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात रस असेल आणि त्यांचं लक्ष केंद्रित राहील.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना आज पैशाच्या बाबतीत चांगले लाभ होतील आणि तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकाल. पैसे कमविण्याचे नवीन मार्ग तयार होतील आणि तुमची बँक शिल्लक लक्षणीय वाढेल. तुम्हाला कुटुंब आणि प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची आणि भावनिक आणि आनंददायक वेळ घालवण्याची संधी मिळेल. हनुमानजींच्या कृपेने आज तुमच्या जीवनात नवीन उर्जा येईल, जी तुम्हाला नवीन यशाच्या दिशेने घेऊन जाईल आणि तुम्ही प्रत्येक काम करण्यास तयार असाल. जर लव्ह लाईफमध्ये असणारे लव्ह मॅरेजचा विचार करत असतील तर आज तुम्हाला तुमचे नाते मजबूत करण्याची सुवर्णसंधी मिळेल. नोकरदार लोक आणि व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळेल आणि आपापल्या क्षेत्रात चांगले नाव कमवण्यातही यश मिळेल.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. मकर राशीचे लोक आज आपल्या कमाईवर पूर्णपणे समाधानी राहतील. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसाठी काही खास आणि महागड्या भेटवस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे ते आनंदी होतील आणि नातं मजबूत होईल. जर व्यावसायिक आपल्या कामाच्या ठिकाणी काही बदल करण्याचा विचार करत असतील तर आजचा दिवस यासाठी अनुकूल असेल. या राशीच्या नोकरदारांना आज परदेशातून उत्तम संधी मिळण्याचे संकेत आहेत, आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा असेल. हनुमान जयंतीनिमित्त आज तुम्ही कुटुंबासोबत हनुमान मंदिरात जाऊ शकता आणि उपवास देखील ठेवू शकता. आज तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.


मीन रास (Pisces)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला असेल, तुम्हाला नवीन नोकरी आणि चांगल्या कामाच्या संधी मिळू शकतात. कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचं तर, आज कुटुंबात विशेष पाहुणे येऊ शकतात. नोकरदार लोक आज त्यांच्या कामाबाबत व्यावसायिक नियोजन करतील. आज तुम्ही तुमची क्षमता आणि बुद्धिमत्ता जगासमोर सिद्ध करू शकाल. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने तुम्ही धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल आणि दानधर्मासाठी पैसे खर्च करू शकता.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Hanuman Jayanti Wishes : हनुमान जयंतीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; बजरंगबलीचं आठवा रुप, पाठवा 'हे' मेसेज