Astrology Panchang 22 October 2024 : आज मंगळवार, 22 ऑक्टोबर रोजी मिथुन राशीत चंद्राचं भ्रमण होणार आहे. तसेच आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून या दिवशी त्रिपुष्कर योग, रवियोग आणि अर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 3 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. मेष राशीचे लोक आज आपल्या इच्छा सहज पूर्ण करू शकतील आणि इतर दिवसांच्या तुलनेत आज घरात शांतता राहील. आज नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला पैसे कमावण्याचे नवीन मार्ग सापडतील आणि खर्च कमी करून पैसे वाचवता येतील. नोकरी करणाऱ्यांच्या मेहनतीचं आज अधिकाऱ्यांकडून कौतुक होऊ शकतं आणि सहकाऱ्यांसोबत तुमचं बोलणंही चांगलं राहील. त्याचबरोबर सणासुदीचा काळ येत असल्याने व्यावसायिक नवीन उत्पादनं सादर करताना दिसतील आणि नवीन ऑफर्स घेऊन येतील. आज मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेतही होईल.
सिंह रास (Leo)
आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. सिंह राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात आज चांगली वाढ होईल, ज्यामुळे ते प्रत्येक काम चांगल्या रितीने करतील. आज अपूर्ण कामं पूर्ण करण्यावर भर असेल. गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील, आज गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगला नफा मिळेल. आज तुम्हाला तुमच्या खर्चातही घट दिसून येईल. आज दुकानदार किंवा व्यावसायिकांच्या विक्रीत चांगली वाढ होईल. वैवाहिक जीवनात काही कलह चालू असेल तर ते आज संपुष्टात येतील आणि जोडीदारासोबत परस्पर समंजसपणा वाढेल. तुमच्या भावा-बहिणींसोबत तुमचे संबंधही चांगले राहतील.
कन्या रास (Virgo)
आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी लाभाचा असणार आहे. कन्या राशीच्या लोकांच्या घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे बरीच कामं निघतील आणि त्यांना भविष्यासाठी आज वडिलांचं मार्गदर्शन देखील मिळेल, ज्यामुळे तुम्हाला बरेच फायदे होतील. आज तुम्हाला अचानक अतिरिक्त पैसे मिळवण्याचा मार्ग मिळेल, ज्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल आणि तुम्हाला काही मालमत्ता आणि जमिनीत गुंतवणूक करण्याची संधीही मिळेल. आज कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असून दिवाळी बोनसबाबत चर्चा होऊ शकते. दुसरीकडे, जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालवत असाल, तर आज चांगला नफा मिळण्याची चिन्हं आहेत आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार देखील कराल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: