Astrology 22 May 2024 : आज बुधवार, 22 मे रोजी सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे शुक्रादित्य योग तयार झाला आहे. त्याच प्रमाणे आज चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करणार आहे. तसेच आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असून या दिवशी शुक्रादित्य योगासह रवियोग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 3 राशींना आज तयार होत असल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? पाहूया.


मेष रास (Aries)


आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. मेष राशीच्या लोकांना बाप्पाच्या कृपेने आज कामात येणाऱ्या अडचणींपासून आराम मिळेल. आज तुमचा कल अध्यात्मिक कार्याकडे असेल, त्यामुळे तुम्ही संपूर्ण कुटुंबासह तीर्थयात्रेला देखील जाऊ शकता. नोकरदार लोक आज त्यांच्या कार्यशैलीने वरिष्ठांना प्रभावित करण्यात यशस्वी होतील आणि त्यांचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतील. आज व्यावसायिकांना चांगला नफा होईल आणि नफा मिळवण्याच्या अनेक अद्भुत संधीही मिळतील. आज तुम्ही तुमच्या नावावर नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. आज तुम्हाला एखाद्या नातेवाईकाच्या ठिकाणी जाण्याची संधी देखील मिळेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगलं राहील आणि सर्व काही तुमच्या इच्छेनुसार होईल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील.


सिंह रास (Leo)


आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. आज बाप्पाच्या कृपेने जीवनातील सर्व संकटं दूर होतील. व्यावसायिकांना व्यवसायात चांगलं यश मिळेल आणि ते त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन योजना देखील राबवतील, ज्यामुळे बँक बॅलन्स वाढेल. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना त्यांच्या प्रयत्नांचे आज सकारात्मक परिणाम दिसून येतील. नोकरदार लोकांचे बॉस आज त्यांच्या कामाची प्रशंसा करतील. आज तुमचं करिअर मजबूत होईल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, जर तुमच्या जोडीदारासोबत काही वाद चालू असेल तर तो आज संपेल आणि तुम्ही बाहेर एकत्र जेवायला जाऊ शकता. प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण होईल आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.


धनु रास (Sagittarius)


आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. धनु राशीच्या लोकांचा आज आत्मविश्वास वाढेल, ज्याचा त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल आणि ते त्यांचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतील. नोकरदार लोकांना आज कामाच्या ठिकाणी पूर्ण जोश आणि उत्साहाने काम करण्याची संधी मिळेल, त्यांना त्यांच्या कामात अपार यश मिळेल. या राशीचे विद्यार्थी ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे, ते आज त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतात. मित्रांसोबत कुठेतरी सहलीला जाण्याचा बेत आखाल आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडाल. कुटुंबात सुख-शांती राहील आणि भावा-बहिणींशी संबंध चांगले राहतील. तुमच्या पालकांचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल आणि त्यांच्या मदतीने तुमची अनेक कामं पूर्ण होतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 22 May 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य