Astrology Today 2 April 2024 : आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीमुळे फार महत्त्वाचा मानला जातो. आज मंगळवार, 2 एप्रिल रोजी धनु राशीनंतर चंद्र मकर राशीत जाणार आहे. तसेच आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी शिवयोग, मालव्य योग आणि पूर्वाषाढ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. वृषभ राशीचे लोक आज आपला खर्च भागवू शकतील आणि पैशाची बचत देखील करू शकतील. मंगळाच्या अनुकूल स्थितीमुळे तुमचा आत्मविश्वास अधिक असेल, त्यामुळे तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक महत्त्वाचे निर्णय घ्याल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. जे लोक नोकरी करतात ते त्यांचं काम वेळेवर करतील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीसाठीही धावून जातील. व्यवसायातून तुम्हाला चांगले आर्थिक लाभ मिळतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. घरातील लहान मुलांसाठी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जाऊन शॉपिंग देखील करू शकता, ज्यामुळे मुलं खूप आनंदी होतील.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. मिथुन राशीचे लोक आज धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग दर्शवतील. आज तुम्ही जे काही निर्णय घ्याल त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसतील. तुम्ही पैसे कमवू शकाल आणि करिअरच्या प्रगतीसाठी अनेक शुभ संधी तुम्हाला मिळतील. लव्ह लाईफमध्ये काही गैरसमज होत असतील तर आज ते संवादातून दूर करा. या राशीच्या लोकांना दीर्घकालीन गुंतवणुकीचे चांगले फायदे मिळतील आणि तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली राहील. नोकरदार लोकांना आज एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला मनापासून आनंद होईल. आई-वडिलांशी तुमचं नातं अधिक घट्ट होईल आणि त्यांच्या आशीर्वादाने अनेक अपूर्ण कामं पूर्ण होतील.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आज कन्या राशीच्या लोकांच्या अनेक वर्षांपासूनच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमची प्रलंबित कामं देखील पूर्ण होऊ लागतील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. बाप्पाच्या कृपेने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि तुमचे अडकलेले पैसेही मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल आणि तुम्हाला बढती देखील मिळू शकेल. रोजगाराच्या शोधात इकडे-तिकडे भटकणाऱ्या लोकांना आज चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या भावांसोबत तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर, तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि सर्व गैरसमज दूर होतील.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. धनु राशीचे लोक आज कुटुंबाच्या गरजा भागवू शकतील, सर्व खर्च सहजपणे पूर्ण करू शकतील. तसेच, जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर आज तुम्हाला त्यातून चांगला परतावा मिळणार आहे. जर नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही समस्या येत असतील तर आज ते अधिकाऱ्यांशी बोलू शकतात. काही घरगुती कामं तुम्ही जबाबदारीने पार पाडाल, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील. जर तुम्ही याआधी एखाद्याला पैसे दिले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळतील. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने धनु राशीच्या लोकांच्या कुटुंबात सुख-शांती नांदेल आणि त्यांना आरोग्यविषयक समस्यांपासून आराम मिळेल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. मीन राशीचे लोक आज आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार करू शकतात, ज्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात दीर्घकाळ चाललेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल आणि नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर आज तुम्हाला आराम मिळेल आणि तुमची प्रतिकारशक्तीही वाढेल. अविवाहित लोकांसाठी आज चांगले विवाह प्रस्ताव येऊ शकतात, ज्याची कुटुंबाशी चर्चा केली जाऊ शकते. विवाहितांचं वैवाहिक जीवन आनंदी असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी सरप्राईज गिफ्टही आणू शकता. याशिवाय सासरच्या मंडळींकडूनही तुम्हाला आर्थिक लाभ होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: