Astrology Panchang 19 August 2024 : आज 19 ऑगस्ट, श्रावणातील तिसरा सोमवार. आज चंद्र मकर राशीनंतर कुंभ राशीत जाणार आहे. तसेच आज श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा आहे, जी नारळी पौर्णिमा (Narali Purnima 2024) म्हणून ओळखली जाते आणि या तिथीला रक्षाबंधन (Raksha Bandhan 2024) सण साजरा केला जातो. आज रक्षाबंधनाच्या दिवशी शोभन योग, गजकेसरी योग आणि श्रवण नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व वाढलं आहे. आज बनत असलेल्या शुभ योगांचा 5 राशींना फायदा होणार आहे, या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच रक्षाबंधनाचा दिवस खूप शुभ असणार आहे. मिथुन राशीचे लोक आज धार्मिक कार्यात सहभागी होतील आणि बहिणी देखील आपल्या भावांना राखी बांधतील, त्यांना शुभेच्छा देतील. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद तुम्हाला प्रेरणा देतील आणि इतरांना मदत केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. परदेशी व्यवसाय करणाऱ्या किंवा प्रवासाची आवड असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल असेल. रक्षाबंधनामुळे आज व्यापाऱ्यांना भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. रक्षाबंधनामुळे घरी नातेवाईकांची ये-जा होणार असून, घरातील मुलं मौजमजा करताना दिसतील. वैवाहिक जीवनात सुरू असलेला कलह आज संपुष्टात येईल आणि तुम्ही काही नातेवाईकांना भेट देऊ शकता, जिथे तुमचं खूप स्वागत केलं जाईल.


सिंह रास (Leo)


आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. आज महादेवाच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांच्या सुख-सुविधा वाढतील आणि तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. रक्षाबंधनामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील आणि नातेवाईकांना भेटण्याची संधीही मिळू शकते. आज तुम्ही एखाद्या खास नातेवाईकालाही भेटू शकता ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना आज आर्थिक फायदा होऊ शकतो आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. रक्षाबंधनामुळे आज व्यावसायिकांना व्यवसायाच्या आघाडीवर प्रगती दिसेल. आज बायका नवऱ्यासोबत आईवडिलांच्या घरी जातील, तिथे खूप आदरातिथ्य होईल आणि आर्थिक फायदाही होऊ शकेल. 


Shravan 2024 : आज श्रावणातील तिसरा सोमवार; महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी?


धनु रास (Sagittarius)


आजचा, म्हणजेच रक्षाबंधनाचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. धनु राशीच्या लोकांच्या उत्पन्नात आज चांगली वाढ होईल आणि ते घरातील गरजांवरही पैसे खर्च करतील. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील  तणाव आज महादेवाच्या कृपेने दूर होईल आणि तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडू शकाल. तुम्हाला कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी कळेल, ज्यामुळे घरातील सर्व सदस्य खूप आनंदी होतील. घरातील मुलं खूप मस्ती करताना दिसतील, जे पाहून तुम्हीही खूप खुश व्हाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध राखण्यात यशस्वी व्हाल.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. आज महादेवाच्या कृपेने मकर राशीच्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि त्यांना भागीदारांच्या मदतीने अधिक लाभ मिळेल. रक्षाबंधनामुळे घरात आनंदाचं वातावरण असेल आणि भाऊ आपल्या बहिणींना विशेष भेटवस्तू देतील. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील. भाऊ आणि बहीण मिळून परोपकारी कार्य करतील, ज्यामुळे त्यांचं नातं अधिक घट्ट होईल. रक्षाबंधनामुळे बाजारपेठेत मोठी वर्दळ असेल, व्यापारी त्याचा फायदा घेताना दिसतील. 


कुंभ रास (Aquarius)


आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. कुंभ राशीचे लोक त्यांच्या भावांच्या मदतीने त्यांचे प्रलंबित काम आज पूर्ण करू शकतात. आज तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. व्यवसायात वेळोवेळी घेतलेले निर्णय प्रभावी ठरतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायी वेळ घालवाल. बहिणी भावांना राखी बांधतील आणि तुम्हाला चांगली मिठाई खाण्याची संधीही मिळेल. सासरच्या मंडळींकडूनही आर्थिक लाभ होताना दिसतो. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 19 August 2024 : आज रक्षाबंधन; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य