Astrology Today 18 March 2024 : आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीमुळे फार महत्त्वाचा मानला जातो. आज, सोमवार, 18 मार्चला चंद्र मिथुन राशीत प्रवेश करत आहे. तसेच आज फाल्गुन मासातील शुक्ल पक्षाची नववी तिथी असून या दिवशी सौभाग्य योग, शोभन योग, रवियोग आणि अर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. मेष राशीच्या लोकांना आज अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून त्यांना कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी देखील मिळेल. भाऊ-बहिणींकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील. एखाद्या कायदेशीर बाबतीत तुम्हाला अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याची आवश्यकता असेल, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकाल. नोकरी करणाऱ्यांना सहकाऱ्यांकडून मदत लाभेल. आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. मेष राशीच्या लोकांचं सोशल सर्कल वाढेल आणि ते नवीन लोकांशी मैत्री करतील. वडिलांसोबत काही वाद चालू असतील तर ते आज मिटतील आणि त्यांच्या मदतीने अनेक कामं पूर्ण होतील.


सोमवारचा उपाय : कुटुंबात सुख-शांतीसाठी गव्हाचे पीठ, तूप आणि साखरेपासून बनवलेल्या वस्तू शंकराला अर्पण करा. त्यानंतर ते गरीब आणि गरजू लोकांना वाटा.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. कर्क राशीच्या लोकांना आज महत्त्वाच्या कामात यश मिळेल, समाजात तुमची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला करिअरमध्ये आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. आज तुमचं एखाद्या व्यक्तीकडे आकर्षण वाढू शकतं. लव्ह लाईफमध्ये असलेल्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज तुम्ही जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता. सासरच्या लोकांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि त्यांच्या मदतीने प्रलंबित कामं पूर्ण होतील. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आणि अधिकाऱ्यांशी संबंधही चांगले राहतील. तुम्ही तुमच्या भावा-बहिणींसोबत चांगला वेळ घालवाल आणि कुटुंबातील शांतिमुळे तुमचं मन प्रसन्न राहील.


सोमवारचा उपाय : शुभ फळ मिळवण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी शिव मंदिरात शिव चालिसा पठण करा आणि गरीब आणि गरजू लोकांना मदत करा.


सिंह रास (Leo)


आज सिंह राशीच्या लोकांच्या मानसन्मानात वाढ होईल. सिंह राशीचे लोक आज आनंदी असतील, कारण त्यांच्या इच्छा महादेवाच्या कृपेने पूर्ण होतील. आज तुम्हाला तुमचा खास मित्र भेटेल. व्यापाऱ्यांना बऱ्याच काळ मंदीचा सामना करावा लागला असेल तर आज तुम्हाला चांगला नफा मिळेल. मेहनतीमुळे तुम्हाला व्यावसायिक जीवनात यश मिळेल. जर सिंह राशीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल तर आज निकाल येऊ शकतो, जो खूप चांगला असेल. नोकरदार लोकांना आज स्वतःच्या इच्छेनुसार काम करायला आवडेल.


सोमवारचा उपाय : काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहा.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तूळ राशीच्या लोकांना पैसे कमावण्याचे इतर स्त्रोत सापडतील. जे स्वतःचा व्यवसाय चालवतात त्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. आई-वडिलांच्या आशीर्वादाने आज कोणतेही काम केलं तर ते नक्कीच पूर्ण होईल. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल आणि कुटुंबासह मंदिरात वैगेरे जाऊ शकता. आज तुम्हाला व्यावसायिक योजनांमध्ये यश मिळेल, ज्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक फायदा होईल आणि इतर व्यवसायातही गुंतवणूक करता येईल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा कराल आणि तुमचं नातं मजबूत राहील. संध्याकाळी मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.


सोमवारचा उपाय : पाण्यात तूरडाळ मिसळून शिवलिंगावर अर्पण करा आणि शिव रक्षा कवच मंत्राचा जप करा.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. मकर राशीच्या लोकांना आज कुटुंबाचं सहकार्य लाभेल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशनची बातमी मिळाल्याने आनंद होईल आणि तुम्ही कामाच्या ठिकाणी लोकांकडून सहजपणे कामं करून घेऊ शकाल. भागीदारीत कोणताही व्यवसाय करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उद्देशाने परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या नवीन कल्पना तुमच्या मनात येऊ शकतात आणि त्यावर काम करायला सुरुवात करू शकता. जर तुम्ही आजारी असाल तर आज तुम्हाला थोडं बरं वाटेल. तुम्ही मित्रांसोबत पार्टी करण्याचा आणि त्यांच्यासोबत कुठेतरी जाण्याचा विचार कराल.


सोमवारचा उपाय : सौभाग्य वाढवण्यासाठी सोमवारी उपवास ठेवा आणि शिवलिंगावर दूध, पाणी, दही, बेलपत्र, अक्षत, धतुरा, गंगाजल इत्यादी वाहा आणि नंतर शिव चालिसा पठण करा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shani Uday 2024 : शनीच्या उदयामुळे आजपासून 'या' राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू; कमावणार बक्कळ पैसा, बँक बॅलन्स वाढणार