Astrology 17 August 2024 : आज 17 ऑगस्टचा दिवस म्हणजेच शनिवारचा दिवस. ग्रहांच्या स्थितीनुसार, आज शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे त्याचबरोबर आज शनी प्रदोष (Shani Pradosh) व्रताच्या दिवशी प्रीति योग (Yog), आयुष्मान योग आणि पूर्वाषाढ नक्षत्र असे शुभ संयोग जुळून आले आहेत त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींवर होणार आहे. या 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
आजचा दिवस मेष राशीसाठी खास असणार आहे. शनीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख-शांती नांदेल. तसेच, तुमच्या व्यापारात चांगली वाढ होईल. जर तुमच्या घरी वाद सुरु असतील तर हे वाद लवकरच संपुष्टात येतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्या कामात ते तुम्हाला सहकार्य करताना दिसतील. जर तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे असतील तर ती या कालावधीत पूर्ण होतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार फलदायक असणार आहे. शनीदेवाच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, जर एखाद्या विषयाला घेऊन अनेक दिवसांपासून जर तुम्ही तणावात असाल तर हा ताण लवकरच संपेल. नशिबाच्या साथीने तुम्हाला चांगला धनलाभ होईल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती मजबूत असल्या कारणाने पैशांसाठी तुम्हाला धावपळ करावी लागणार नाही.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज तुम्हाला मानसिक तणाव जाणवणार नाही. तसेच, तुमची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ चांगली असेल.
तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त मजबूत असेल. नोकरदार वर्गातील लोकांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर संबंध चांगले असतील. कामाच्या ठिकाणी दिलेल्या जबाबदाऱ्या तुम्ही वेळेत पूर्ण करु शकाल. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असेल. नात्यात दुरावा येणार नाही.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार चांगला असणार आहे. आर्थिक संपत्तीच्या बाबतीत तुम्ही फार संपन्न आणि परिपूर्ण असाल. कोर्ट कचेरीसंदर्भातील तुमचे वाद लवकरच संपुष्यात येतील. शनीच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. जर तुम्हाला धार्मिक स्थळी भेट द्यायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :