Astrology Today 15 March 2024 : आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीमुळे फार महत्त्वाचा मानला जातो. आज, शुक्रवार, 15 मार्चला चंद्र वृषभ राशीत राहील. तसेच आज फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. यासह आज प्रीति योग, शुक्र-मंगळ यांच्या युतीमुळे धन लक्ष्मी योग आणि कृतिका नक्षत्र यांचा शुभ संयोग होणार आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी मान-प्रतिष्ठा वाढवणारा असेल. मेष राशीचे लोक आज आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे, तुम्हाला परदेशातून लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुमच्यावर कामाचा जास्त ताण असेल तर तुम्ही घरातील व्यक्तींशी तुमचे विचार शेअर करू शकता. आज देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला काही नवीन संपत्ती मिळेल असं दिसतं, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. या राशीचे नोकरदार आज व्यवसाय सुरू करण्याची योजना आखू शकतात. आज तुम्ही तुमचे खर्च चांगल्या प्रकारे हाताळाल.
उपाय : आर्थिक प्रगतीसाठी देवी लक्ष्मीला हळद लावलेली पाच फुलं अर्पण करा आणि देवीची पूजा करा. यानंतर लाल कपड्यात ही फुलं बांधून तिजोरीत किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवा.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. कर्क राशीच्या लोकांना आज लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुमचं मन आनंदी असेल. आज तुम्ही मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा विचारही कराल. कौटुंबिक जीवन चांगलं राहील. गरज पडल्यास तुम्हाला कुटुंबाकडून आर्थिक पाठबळ मिळू शकतं. अविवाहित लोक एखाद्या कार्यक्रमात एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकतात आणि त्यांच्यासोबत बोलणं पुढे नेण्याची संधी देखील तुम्ही शोधाल. कुटुंबाच्या मदतीने अनेक कामं पूर्ण होतील.
उपाय : शुक्रवारी सव्वा किलो तांदूळ लाल कपड्यात बांधून ठेवा आणि नंतर 'ओम श्रीं श्रेय नमः' मंत्राच्या पाच जपमाळ जप करा आणि पैशाच्या ठिकाणी ठेवा.
कन्या (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ असणार आहे. कन्या राशीच्या लोकांना आज अनपेक्षित यश मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल.विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील आणि त्यांचं अभ्यासावर लक्ष लागेल. भागीदारीत व्यवसाय करण्यात तुम्ही रस दाखवाल. तुमच्या जोडीदाराशी तुमचे चांगले संबंध राहतील. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या आज दूर होतील, ज्यामुळे तुम्ही दोघे एकमेकांचं ऐकाल आणि एकमेकांना समजून घ्याल. नोकरदार लोक आणि व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळेल, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये आघाडीवर असाल. तुमचे मित्र तुम्हाला सर्व कामात मदत करतील, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल.
उपाय : नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी लोखंडाच्या भांड्यात पाणी, साखर, दूध आणि तूप मिसळा आणि हे पिंपळाच्या झाडाखाली मुळावर टाका. हा उपाय 21 शुक्रवारपर्यंत करत रहा.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांची आज अध्यात्मात रुची वाढेल. विद्यार्थी आज चांगला अभ्यास करतील. कौटुंबिक वातावरण चांगलं असेल. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत तुमचा दिवस उत्तम जाईल, तुम्ही काल केलेल्या कामामुळे बॉस तुमचं आज कौतुक करेल. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीत उत्स्फूर्तता असेल, ज्यामुळे बरेच लोक तुमच्यावर प्रभावित होतील. जर तुम्हाला पैशाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर ती मित्राच्या मदतीने सोडवली जाईल. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसोबत जेवायला बाहेर देखील जाऊ शकता.
उपाय : शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन देवीची पीजा करा. बताशा, शंख, कमळ, मखणा इत्यादी देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि लक्ष्मी चालिसा पठण करा.
धनु (Sagittarius Horoscope Today)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. धनु राशीच्या लोकांचं एखादं दीर्घकाळ प्रलंबित काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्ही घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींकडून व्यवसायाशी संबंधित काही मदत घेऊ शकता, त्यांच्या मदतीने तुम्ही व्यवसायात काहीतरी नवीन सुरू करण्याची योजना आखू शकता. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ द्याल, तुमचं सांसारिक सुखही वाढेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील आणि तुमच्यावरचं कर्जही हळूहळू कमी होईल. मुलांच्या कोणत्याही परीक्षेच्या निकालामुळे घरात आनंदाचं वातावरण असेल.
उपाय : कुटुंबात सुख-समृद्धीसाठी शुक्रवारी घराच्या मुख्य दारावर गुलाल उधळा आणि नंतर दारात तुपाचा दिवा लावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: