Astrology 07 July 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज रविवारी, 7 जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी रविपुष्य योग, सर्वार्थ सिद्धी योग, हर्षन योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. आज कोणत्या 5 राशींना नशिबाची सर्वाधिक साथ मिळणार? जाणून घेऊया आजच्या भाग्यवान राशी...


मेष रास (Aries)


आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. आज सूर्यदेवाच्या कृपेने मेष राशीचे लोक मोठे निर्णय सहजपणे घेऊ शकतील आणि आपले मत इतरांसमोर मांडू शकतील. या राशीच्या व्यापाऱ्यांना आज अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल.आज तुम्ही धार्मिक कार्यातही सहभागी होऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आज काही नवीन काम सुरू करायचे असेल तर त्यासाठी वेळ चांगली आहे. वैवाहिक जीवनात जर काही कलह चालू असेल तर तो आज संभाषणातून संपुष्टात येईल आणि नात्यातील अंतरही संपेल.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. कर्क राशीच्या लोकांकडे आज कमालीचा आत्मविश्वास असेल, तुमचे विरोधक पराभूत झालेले दिसतील आणि आयुष्यही योग्य दिशेने नेले जाईल. आज व्यवसायात तुम्हाला चांगले काम करावे लागेल, तरच तुमचे काम पूर्ण होताना दिसेल. नोकरदार लोक आज रविवारची सुट्टी एन्जॉय करतील आणि दुसऱ्या दिवसाचे प्लॅन्सही करू शकतील. तुम्ही घरात मुलांसोबत चांगला वेळ घालवाल आणि मित्रांसोबत मजेशीर मूडमध्ये असाल. 


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला लक्षणीय यश मिळेल आणि तुमचे प्रतिस्पर्धी तुमची प्रगती पाहून आश्चर्यचकित होतील.  कुटुंबातील सदस्य तुम्हाला साथ देतील आणि समाजात तुमचा सन्मानही वाढेल. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि काही मालमत्ता एकत्र खरेदी करण्याची शक्यता आहे. मुलांचा विकास पाहून तुम्हाला आनंद होईल आणि जर ते आरोग्याशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असतील तर त्यांचे आरोग्य सुधारेल.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. तूळ राशीचे लोक आज कामात खूप उत्साही राहतील आणि भरपूर पैसे कमावण्यासोबत पैसे वाचवण्यास सक्षम असतील. आज तुम्ही एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीला भेटू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल. तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल तर आज परत येण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला जमीन किंवा वाहन खरेदी करायचे असेल तर तुमचे स्वप्न आज पूर्ण होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम असेल. 


कुंभ रास (Aquarius)


आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. कुंभ राशीचे लोक रात्रंदिवस परिश्रम करून आज आपले ध्येय साध्य करून यश मिळवतील. आज सूर्यदेवाच्या कृपेने तुमचे मनोबल कमालीचे असेल, यामुळे तुम्ही भरपूर धन आणि कीर्ती मिळवण्यात यशस्वी व्हाल. आज तुम्ही तुमची काही अपूर्ण कामे तुमच्या पालकांच्या सल्ल्याने करू शकाल, ज्यामुळे तुमच्या खांद्यावरचा भारही हलका होईल. आज व्यवसायात तुमची ओळख वाढेल आणि एक नवीन करार देखील निश्चित केला जाऊ शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या राशीच्या विद्यार्थ्यांना आज उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे संकेत मिळतील. घरातील लहान मुलांसोबत रविवारची सुट्टी तुम्ही एन्जॉय कराल आणि पाहुणे आल्यावर नवीन डिशचा आनंदही घ्याल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 07 July 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य